‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये शिव ठाकरे व अर्चना गौतम यांच्यामध्ये तुफान राडा झाला. साजिद खान व गौरी नागोरीचं भांडण सुरु असताना शिवने या वादात उडी घेतली. हे भांडण सुरु असताना शिवनंतर अर्चनानेही साजिद-गौरीच्या भांडणामध्ये भाग घेतला. या वादादरम्यान शिव अर्चनाच्या बराच जवळ आला. म्हणूनच अर्चनाने त्याचा चक्क गळा पकडला. पण या सगळ्या भांडणानंतर शिवला ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागत आहे.

आणखी वाचा – Video : मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

actor Gaurav Sareen married to software engineer Jaya Arora
प्रसिद्ध अभिनेत्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीशी केलं लग्न; अमेरिकेत करते काम, म्हणाला, “वेगळ्या प्रोफेशनमधील जोडीदार…”
Celebrity MasterChef faisal shaikh and usha nadkarni dance on badshah new song
Celebrity MasterChef: फैजूचा उषा नाडकर्णींबरोबर बादशाहच्या गाण्यावर भन्नाट…
Bollywood actress Ayesha jhulka wild card entry in celebrity masterchef
Celebrity MasterChef मध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री; ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आता किचनमध्ये लावणार तडका
Yed Lagla Premacha fame Pooja Birari shared special post for vishal nikam
“मी भाग्यवान आहे…” म्हणत ‘येड लागलं प्रेमाचं’ फेम पूजा बिरारीची विशाल निकमसाठी खास पोस्ट, म्हणाली…
Vivian Dsena on Ladla Tag
विवियन डिसेनाला ‘लाडला’ टॅग कसा मिळाला? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा; म्हणाला, “कलर्स टीव्हीसाठी…”
tharla tar mag arjun and sayali haldi ceremony
ठरलं तर मग : ‘या’ दोन व्यक्तींमुळे सायलीला लागणार अर्जुनची उष्टी हळद! काय आहे नवीन प्लॅन? पाहा प्रोमो…
Sakha Maza Pandurang new serial coming soon on sun marathi
Video: पांडुरंग हरी…; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार नवी मालिका, ‘शिवा’मधील ‘हा’ कलाकार झळकणार, पाहा जबरदस्त प्रोमो
kapil sharma
कपिल शर्मा यशस्वी झाल्यानंतर अहंकारी झाल्याच्या दाव्यांवर सहकलाकाराचे वक्तव्य; म्हणाला, “५ टक्केसुद्धा…”
Gharoghari Matichya Chuli
Video : ‘श्री व सौ’ स्पर्धेत जानकी ऐश्वर्याचा खोटेपणा उघड करणार; ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो

शिव साजिद खानचा पोपट असल्याचं प्रेक्षक सतत बोलत आहेत. शिव “सर सर सर” म्हणत साजिदच्या पाठी फिरत असल्याचं प्रेक्षकांना काही पटलं नाही. ‘बिग बॉस १६’च्या सुरुवातीच्या आठवड्यापासूनच शिवने प्रेक्षकांना आपलसं केलं. पण आता साजिदची साथ दिल्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे.

साजिदने भांडणामध्ये गोरी नागोरीला बरंच सुनावलं. तिच्या खासगी आयुष्याबाबत कमेंट केल्या. त्यानंतर साजिदला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. या वादामध्ये शिवचंही नाव घेतलं जात आहे.

शिव महाराष्ट्राचं नाव खराब करत असल्याचंही काही जण बोलत आहेत. तसेच तो आता बरोबर खेळत नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. हा संपूर्ण आठवडाच ‘बिग बॉस’च्या घरातील वादग्रस्त आठवडा ठरला आहे.

आता या वीकेण्ड का वारमध्ये सलमान या सगळ्या वादावर काय भाष्य करणार? कोणत्या स्पर्धकाची सर्वाधिक शाळा घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Story img Loader