‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये शिव ठाकरे व अर्चना गौतम यांच्यामध्ये तुफान राडा झाला. साजिद खान व गौरी नागोरीचं भांडण सुरु असताना शिवने या वादात उडी घेतली. हे भांडण सुरु असताना शिवनंतर अर्चनानेही साजिद-गौरीच्या भांडणामध्ये भाग घेतला. या वादादरम्यान शिव अर्चनाच्या बराच जवळ आला. म्हणूनच अर्चनाने त्याचा चक्क गळा पकडला. पण या सगळ्या भांडणानंतर शिवला ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

शिव साजिद खानचा पोपट असल्याचं प्रेक्षक सतत बोलत आहेत. शिव “सर सर सर” म्हणत साजिदच्या पाठी फिरत असल्याचं प्रेक्षकांना काही पटलं नाही. ‘बिग बॉस १६’च्या सुरुवातीच्या आठवड्यापासूनच शिवने प्रेक्षकांना आपलसं केलं. पण आता साजिदची साथ दिल्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे.

साजिदने भांडणामध्ये गोरी नागोरीला बरंच सुनावलं. तिच्या खासगी आयुष्याबाबत कमेंट केल्या. त्यानंतर साजिदला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. या वादामध्ये शिवचंही नाव घेतलं जात आहे.

शिव महाराष्ट्राचं नाव खराब करत असल्याचंही काही जण बोलत आहेत. तसेच तो आता बरोबर खेळत नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. हा संपूर्ण आठवडाच ‘बिग बॉस’च्या घरातील वादग्रस्त आठवडा ठरला आहे.

आता या वीकेण्ड का वारमध्ये सलमान या सगळ्या वादावर काय भाष्य करणार? कोणत्या स्पर्धकाची सर्वाधिक शाळा घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss 16 shiv thakare troll for he support sajid khan in the house and argument with archana gautam see details kmd