‘बिग बॉस’ हा कार्यक्रम सध्या मराठी, हिंदी या चांगलाच गाजत आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारे स्पर्धक यामुळे हा कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. हिंदी बिग बॉसमध्ये MeToo चे आरोप असलेल्या साजिद खानची एन्ट्री झाल्यापासून निर्माते तसेच होस्ट सलमान खान यांच्यावर जोरदार टीका होत आहे. साजिद खान या कार्यक्रमात सहभागी झाल्यापासून त्याच्यावर कलाकारांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कश्मिरा शाह, राखी सावंत या अभिनेत्रींनी पाठिंबा दर्शवला आहे तर सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मालिवाल यांनीही याला विरोध दर्शविला आहे. साजिद खानला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिलं आहे.
साजिद खानच्या विरोधात आणखीन अभिनेत्रीने विरोध दर्शवला आहे ती अभिनेत्री म्हणजे तनुश्री दत्ता. बिग बॉसच्या घरात साजिदच्या प्रवेशामुळे तनुश्रीने तिची नाराजी व्यक्त केली. अभिनेत्रीने नुकतीच इटाईम्सला मुलाखत दिली आहे ज्यात तिने असे सांगितले की ‘मी घाबरले आहे. या कारवाईच्या निव्वळ बेजबाबदारपणाबद्दल आणि त्याचा जनतेवर होणारा परिणाम पाहून मी अवाक झाले आहे’. तनुश्री दत्ता कायमच चर्चेत असते. आपली मतं ठामपणे मांडत असते.
MeToo चे आरोप असलेल्या साजिद खानवर उर्फी जावेदने व्यक्त केला संताप, म्हणाली “त्याने ज्या मुलींचा…”
दिग्दर्शक साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. FWICE संस्थेने साजिद खानवर बंदी घातली. ‘हिम्मतवाला’ ‘हमशकल्स’ सारखे अपयश दिल्यानंतर, साजिद खान हाऊसफुल ४ द्वारे पुनरागमन करणार होता. तथापि, अशा आरोपांमुळे साजिदला या चित्रपटातून पायउतार होण्यास सांगण्यात आले आणि साजिद-फरहाद या दिग्दर्शक जोडीने चित्रपटाचा ताबा घेतला.
साजिद खानला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून उर्फी जावेदनेही संताप व्यक्त केला होता. अभिनेत्री मंदाना करिमी हिने साजिद खानची ‘बिग बॉस’च्या घरात झालेली एन्ट्री पाहून बॉलिवूडला रामराम ठोकला. मंदाना करिमीने साजिद खानवर MeToo मोहिमे अंतर्गत गंभीर आरोप केले होते.