टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक म्हणजे ‘खतरों के खिलाडी’. गेली अनेक वर्ष या कार्यक्रमातील चित्तथरारक स्टंट्स प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. आता लवकरच १३ वा सीझन सुरू होणार आहे. यंदाच्या १३व्या सीझनमध्ये रॅपर एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी सहभागी होणार असल्याचं अनेक दिवसांपासून बोललं जात होतं. परंतु आता एमसी स्टॅनने या शोला नकार दिल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शेट्टीच्या या स्टंट आणि अ‍ॅडव्हेंचरवर आधारित कार्यक्रमात स्पर्धकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. आणि शेवटी हे सर्व स्टंट उत्तमरीत्या पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला विजेतेपदाची ट्रॉफी दिली जाते. या कार्यक्रमाच्या १३व्या सीझनसाठी या शोच्या निर्मात्यांनी एमसी स्टॅनला विचारणा केली होती.

आणखी वाचा : एमसी स्टॅन ठरला किंग! ‘बिग बॉस १६’ विजेत्याने ‘या’ बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे

पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमसी स्टॅनने रोहित शेट्टीचा शो करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. निर्माते स्टॅनला या कार्यक्रमाचा स्पर्धक बनवण्यासाठी मोठ्या मानधनाची ऑफर देत होते. पण तरीही स्टॅनने त्यांची ही ऑफर नाकारली आहे. त्याला सध्या त्याच्या नव्या गाण्यांवर काम करायचं असल्याने स्टॅनने या कार्यक्रमात भाग घ्यायला नकार दिला.

हेही वाचा : Video: “कोण तो स्टॅण्ड…” चारचौघात राखी सावंतने चुकीचं उच्चारलं ‘बिग बॉस १६’ विजेत्याचं नाव, व्हिडीओ व्हायरल

‘खतरों के खिलाडी १३’ हा शो कलर्स टीव्हीवर १७ जुलै पासून प्रसारित होईल असं बोललं जात आहे. पण अद्याप चॅनेलने किंवा या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी कोणत्याही तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही. याचबरोबर या सीझनचं शूटिंग केपटाऊनऐवजी अर्जेंटिनामध्ये होणार आहे. या आधीचा खतरों के खिलाडीचा ७वा आणि ९वा सीझन अर्जेंटिनामध्ये शूट करण्यात आला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss 16 winner mc stan denies khatron ke khilad offer rnv