शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’च्या अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरली. ‘बिग बॉस १८’ च्या घरातून बाहेर आल्यावर अभिनेत्रीने तिच्या पहिल्या मुलाखतीत, तिला सोशल मीडियावर तिच्या कुटुंबीयांकडून, विशेषतः तिची बहीण नम्रता शिरोडकर आणि तिचा पती अभिनेता महेश बाबू यांच्याकडून कोणताही पाठिंबा न मिळाल्याबाबत प्रतिक्रिया दिली.
Galatta शी बोलताना, शिल्पा शिरोडकरला विचारण्यात आले की, ती बिग बॉसच्या घरात असताना महेश बाबू किंवा नम्रता शिरोडकरसह तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने, सोशल मीडियावर तिच्या समर्थनार्थ काहीही पोस्ट का केले नाही? यावर उत्तर देताना शिल्पा म्हणाली, “अरे देवा! तुम्ही फक्त पोस्टच्या आधारावर कोणत्याही नातेसंबंधाना जज कस काय करू शकता? हे हास्यास्पद आहे! आणि खरं सांगायचं झालं तर, हेच मी बिग बॉसच्या घरात शिकले. मला लोक काय म्हणतात याची काहीही पर्वा नाही. माझ्या कुटुंबाचं माझ्याशी काय नातं आहे आणि मी त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे हेही मला माहीत आहे. आणि मला वाटतं की हेच खरं महत्त्वाचं आहे.”
शिल्पाने पुढे सांगितले की, लोक यावर विविध प्रकारे मतप्रदर्शन करतील, पण त्याचा तिच्या कुटुंबीयांबरोबरच्या नातेसंबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. बिग बॉसच्या घरात असताना शिल्पाने नम्रता शिरोडकरबरोबरच्या वादाचा उल्लेख केला होता. तिने चित्रपट निर्माते अनुराग कश्यपबरोबर यांच्या ब संभाषणात सांगितले की, शोमध्ये जाण्यापूर्वी तिला नम्रताशी मोठा वाद झाला होता. यानंतर तिला याचा पश्चात्ताप झाला होता आणि तिच्या कुटुंबाची खूप आठवण येत असल्याचे सांगितले होते.
हेही वाचा…Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
काही आठवड्यांपूर्वी शिल्पा शिरोडकरला बिग बॉसच्या घरात तिची मुलगी अनुष्का रंजीत भेटायला आली होती. तिला पाहताच शिल्पा भावुक होत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.