अभिनेत्री अमृता देशमुख मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिका, नाटक, चित्रपटांच्या माध्यमातून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या ती ‘नियम आणि अटी लागू’ नाटकामुळे चर्चेत आहे. नुकतच अमृता ‘नियम आणि अटी लागू’ नाटकासाठी दीड महिन्यांच्या परदेश दौऱ्यावर जाऊन आली. अमेरिकेत या नाटकाचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा- “मी आणि पप्या भेटलो की…”; सुप्रिया पाठारेंनी शेअर केला ‘दगडू’बरोबरचा खास फोटो, म्हणाल्या…

गेले दीड महिना अमृता या नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत होती. या दौऱ्यादरम्यान अमृता अमेरिकेतील अनेक प्रेक्षकांना भेटली. अमृताने त्यांच्या घरी जाऊन तिथल्या पदार्थांचा आस्वादही घेतला या भेटीचा एक कोलाज व्हिडीओ अमृताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिथल्या सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा- “मला पुन्हा लग्न करायचं आहे”, घटस्फोटानंतर तेजश्री प्रधानने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “होणारा नवरा…”

अमृताने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे “माझे नातेवाईक आत्ता-आत्ता कुठे माझ्या लक्षात रहायला लागले होते आणि अचानक इतक्या families ची माझ्या आयुष्यात entry झाली. जे माझे होस्ट होते..USA मध्ये आमटी भात ते मेक्सिकन सगळं ह्या लोकांनी प्रेमाने दिलं..काहींनी खास सुट्ट्या काढून भूर नेलं..! अशी पण काही लोकं आहेत जी ह्या photos मध्ये नाहीएत पण त्यांच्या प्रेमामुळे ते माझ्या मनात pinned ? आहेत..आता ही सगळीच मंडळी instagram वर नाहीत..पण तरी instantly मनात घर करून गेलीयेत..Thank You so much all of you”

काही दिवसांपूर्वीच अमृता आणि अभिनेता प्रसाद जवादेने गूपचूप साखरपुडा करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता दोघे १८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. बिग बॉस’च्या घरात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेची घट्ट मैत्री झाली होती. दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.