मनोरंजनसृष्टीतील सगळेच कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आपल्या लाडक्या कलाकाराच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याच्या मनात असते. विशेषत: सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होतात. यापूर्वी अनेक मराठी कलाकारांनी इन्स्टाग्रामवर बालपणीचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. आता यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे.

हेही वाचा : प्रेमाची जाहीर कबुली दिल्यावर मीरा जोशीने सांगितली लग्नाची तारीख! कोण आहे अभिनेत्रीचा होणारा नवरा?

Bollywood actress Ayesha jhulka wild card entry in celebrity masterchef
Celebrity MasterChef मध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री; ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आता किचनमध्ये लावणार तडका
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
anil kapoor
अभिनेत्रीचा ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्याबरोबरच्या किसिंग सीनबाबत खुलासा; म्हणाली, “मला रडावे…”
karan veer mehra second wife Nidhi Seth talks about husband sandip kumar
अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, पतीबद्दल म्हणाली, “तो खूपच…”
amruta Khanvilkar
‘३ इडियट्स’मध्ये करीना कपूर ऐवजी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची झाली होती निवड; रोहन मापुस्कर म्हणाले, “मोठे स्टार…”
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”

नाटक, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम करून ही अभिनेत्री महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात या अभिनेत्रीने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात तिने ‘पुण्याची टॉकरवडी’ अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. बिग बॉसमुळे अभिनेत्रीला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. लवकरच ती जवळच्या मित्राबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.

हेही वाचा : “दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे चांगला की प्रसाद ओक?” अमृता खानविलकरने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली…

ओनम सणानिमित्त अभिनेत्रीने केरळ संस्कृतीचे दोन फोटो शेअर केले होते. यातील पहिल्या फोटोमध्ये तिने केरळची सिल्क साडी नेसली आहे. हा फोटो सध्याचा असून, दुसरा फोटो अभिनेत्रीच्या बालपणीचा आहे. ही लहान मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री अमृता देशमुख आहे. बालपणीच्या फोटोमध्ये अमृताला ओळखणे फार कठीण आहे.

हेही वाचा : “मुलीवर प्रेम असल्याचं…”, करण जोहरने केला मोठा खुलासा; म्हणाला, “‘त्या’ शब्दामुळे नैराश्येत होतो”

अमृता देशमुखने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ती लवकरच अभिनेता प्रसाद जवादेसह लग्न करणार आहे. बिग बॉसच्या घरात दोघांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. येत्या १८ नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तिने ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकेद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.

Story img Loader