‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाद्वारे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री वीणा जगताप लवकरच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये वीणा नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारणार आहे. अभिनेत्रीचे मालिकेमधील लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’नंतर वीणाने काही मालिकांमध्ये काम केले परंतु, त्यानंतर तिने टीव्ही माध्यमापासून काही काळ ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी वीणा सज्ज झाली आहे.

हेही वाचा : “लक्ष्मीच्या पावलांनी हे पदरात…”, ‘बाईपण भारी देवा’ला ५० दिवस पूर्ण, केदार शिंदेंनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Premachi Goshta Fame Mrunali Shirke appear in hindi serial ghum hai kisikey pyaar meiin
‘प्रेमाची गोष्ट’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी, पाहायला मिळणार ‘या’ भूमिकेत
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Marathi Actress tejashri Pradhan want to again play rj role in asehi ekda vhave movie
तेजश्री प्रधानला ‘ही’ भूमिका पुन्हा एकदा जगायला आवडेल, म्हणाली, “तेव्हा मला…”

‘योग योगेश्वर जय शंकर’ या कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत वीणा जगताप महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मालिकेच्या नव्या कथानकानुसार वीणा जगताप ‘योगदायिनी पार्वती माता’ ही भूमिका साकारणार आहे. अभिनेत्रीला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. वीणाचा मालिकेतील पहिला लुक समोर आला आहे. तिला या नव्या लूकमध्ये ओळखणेही कठीण झाले आहे.

हेही वाचा : “त्यांनी माझी खिल्ली उडवली”, ‘चंद्रमुखी’ चित्रपटाबद्दल मानसी नाईकने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, ” तेव्हा दिग्दर्शक-निर्माते…”

वीणा जगतापने काही महिन्यांपूर्वी मेकअप आर्टिस्ट झाल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. यानंतर ती कलाविश्वातून ब्रेक घेणार असा अंदाज वर्तवला जात होता परंतु, आता नव्या मालिकेत एन्ट्री होणार असल्याने वीणा जगतापचे चाहचे प्रचंड आनंदी आहेत. इन्स्टाग्रामवर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : Video : “खरे संस्कार पुरुषांवर…”, मराठी अभिनेत्याचा लहान मुलगा शिकतोय स्वयंपाक, नेटकरी म्हणाले, “या वयात आम्हाला…”

दरम्यान, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून वीणाने मनोरंजन विश्वात पदार्पण केले. यानंतर अभिनेत्री ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. बिग बॉसमध्ये चांगली कामगिरी करत वीणाने अंतिम फेरी गाठली होती. यानंतर ‘आई माझी काळुबाई’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकांमध्ये वीणाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

Story img Loader