सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. कलाकार मंडळींनी तर बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. त्यांच्याबाबत अनेक अफवा पसरवल्या जातात. असंच काहीसं ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वामध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्रीबरोबर घडलं आहे. अभिनेत्री मीरा मीरा जगन्नाथने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिच्याबाबत घाणेरड्या अफवा पसरवणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.
आणखी वाचा – Video : अभ्युदयनगरमधील छोटसं घर ते आलिशान फ्लॅट, आदेश बांदेकरांच्या स्वीट होमची झलक पाहिलीत का?
गेले काही दिवस आपल्याबाबत सोशल मीडियाद्वारे घाणेरड्या अफवा पसरवल्या जातात असं मीराचं मत आहे. म्हणूनच यासंदर्भात तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याविषयीची माहिती तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पोस्ट शेअर करत दिली.
मीरा जगन्नाथ काय म्हणाली?
“सोशल मीडियावर एखाद्या विषयी घाणेरड्या अफवा पसरवून त्यांच्या विषयी लोकांना चुकीची माहिती देणे आणि पर्यायाने त्यांची मानहानी करणे हा कायद्याने शिक्षेस पात्र गुन्हा आहे. जो काही समाजकंटक आता माझ्या विरोधात करत आहेत. आपल्याला जर अशा पद्धतीचे काही मॅसेज किंवा पोस्ट दिसल्या तर कृपया अकाऊंट रिपोर्ट किंवा ब्लॉक करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. मुंबई पोलिस व सायबर पोलिस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. लवकरच गुन्हेगार पकडले जातील.” असं मीराने पोस्टद्वारे म्हटलं आहे.
आणखी वाचा – ५६व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता ३३ वर्षाने लहान मुलीशी करणार दुसरं लग्न, म्हणाला, “यामध्ये गैर काय?”
मीराच्या या पोस्टवरून तिच्याबाबत घाणेरड्या अफवा पसरवल्या जात असल्याने तिला मानसिक त्रासही सहन करावा लागत असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच गप्प न बसता अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्यांना धडा शिकवण्याचं मीराने ठरवलं आहे.