‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या शोच्या पहिल्या भागापासूनच चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाची एक वेगळीच बाजू या शोमध्ये पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी अपूर्वाची शाळा घेतली. स्पर्धक किरण मानेशी तिचं असलेलं भांडण तर प्रचंड गाजलं. पण आता अपूर्वाचा एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – ‘तू तेव्हा तशी’च्या वल्लीने शरीराच्या ‘या’ भागावर गोंदवला गणपतीचा टॅटू, म्हणाली, “जर कोणाला…”

‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विकास सावंत व मेघा घाडगे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. हा वाद सुरु असताना मध्येच किरण माने बोलू लागले. किरण माने बोलत आहेत हे पाहून अपूर्वाने किरण यांना सुनावयला सुरुवात केली. तिची भाषा अरे तुरे पर्यंत पोहोचली. पण आता अपूर्वा घरातील स्पर्धकांबरोबर मजा-मस्ती करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

विकास सावंतबरोबर अपूर्वाची गट्टी जमली आहे. हे दोघं घरामध्ये तुफान राडा करत आहेत असं म्हणायला हरकत नाही. ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या भागामध्ये या दोघांमधील मैत्री पाहायला मिळाली. तसेच कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अपूर्वा-विकास धमाल करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – Video : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या ‘त्या’ सीनदरम्यान एक चूक घडली अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

विकास अपूर्वाला उचलण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान अपूर्वा म्हणते, “तू मला उचलणार एवढी अपूर्वा नेमळेकर स्वत झालेली नाही.” धमाल-मस्ती सुरु असताना अपूर्वा विकासच्या चक्क अंगावर बसते. अपूर्वा-विकासची मैत्री पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी विविध कमेंट केल्या आहेत. विकासमुळे अपूर्वाची नवी बाजू पाहायला मिळाली असं प्रेक्षक म्हणत आहेत.

Story img Loader