‘बिग बॉस’ मराठीचं चौथं पर्व चांगलंच गाजणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. शोच्या पहिल्या आठवड्यापासूनच स्पर्धकांमध्ये भांडण, राडे सुरु झाले आहेत. आता चक्क एकमेकांना धक्काबुक्की तसेच भांडणाचं स्वरुप बदललं असल्याचं नव्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नवा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये घरातील स्पर्धक टास्कदरम्यान एकमेकांबरोबर जबरदस्त भांडण करताना दिसत आहेत. तसेच किरण माने विरुद्ध टीमला टोमणे मारताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भांडण-वाद आणि बरंच काही
‘बिग बॉस’च्या घरामध्ये प्रत्येक नव्या दिवशी स्पर्धकांना वेगवेगळ्या टास्कचा सामना करावा लागतो. आताही ‘बिग बॉस ४’ मराठीच्या स्पर्धकांसमोर नवा टास्क आहे. ‘बिग बॉस’ विमानतळ गार्डन परिसरामध्ये तयार करण्यात आलं आहे. हा टास्क दोन टीममध्ये खेळला जाणार आहे. व्हिडीओच्या प्रोमोवरून घरातील दोन टीममध्ये जबरदस्त भांडण होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

टास्कदरम्यान किरण माने यांची जीभ घसरली असल्याचंही पाहायला मिळत आहे. “कॅमेरा बघतोय लाज बाळगा.” असं किरण माने या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. तसेच “दात पाडेन” असे वेगवेगेळ संवाद स्पर्धकांच्या तोंडी ऐकायला मिळत आहेत. म्हणजेच या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये जबरदस्त भांडण होणार असल्ययाचं दिसत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4 : “अरे ए किरण माने तुला…” अपूर्वा नेमळेकरची दादागिरी सुरुच, राग अनावर झाला अन्…

याआधी अपूर्वा नेमळेकरचा राग अनावर झाला होता. यावेळी तिने किरण माने यांच्याशी एकेरी भाषेमध्ये संवाद साधला. आता ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये आणखी काय काय नवं पाहायला मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss marathi 4 new promo viral actor kiran mane angry with opposite team watch video kmd