‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. गेल्या आठवड्यात समृद्धी जाधव घराबाहेर पडली होती. आता तेजस्विनी लोणारीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. तिच्या एक्सिटमुळे तिचे चाहते आणि आणि बिग बॉसचे माजी स्पर्धक व्यक्त होऊ लागलेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेजस्विनीला टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तिला खेळातून बाहेर पडायचं की ‘बिग बॉस’च्या घरात राहायचं, हा निर्णय तेजस्विनीला घेण्यास बिग बॉसने सांगितला होता. त्यावेळी तेजस्विनीने घरात राहून खेळ खेळण्यासाठी बिग बॉसला विनंती केली होती. परंतु, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं बिग बॉसने सांगितलं होतं.

“…आणि एका आठवड्यात GR काढण्याचे आदेश”; प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

कलर्स वाहिनीने या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यावर आता कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘बिग बॉस सीजन २’ चा स्पर्धक आणि अभिनेता अभिजित केळकर असं म्हणाला की “तुला कोणत्याही कारणाने बाहेर काढलं किंवा पडावं लागलं तर मी बिग बॉस बघणं सोडून देईन.” ‘बिग बॉस सीजन १’ ची स्पर्धक मेघा धाडे म्हणाली “जिंकण्यासाठी तूच एकमेव पात्र आहेस.” तर एकाने लिहले आहे “हे खूप धक्कादायक आहे”. दुसऱ्याने लिहले आहे “या सीजनची जान निघून गेली आहे.” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तेजस्विनीची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर बिग बॉसने निर्णय दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताच्या दुखापतीमुळे तेजस्विनीला पुढील खेळ खेळणे सोयीचे नसल्याने तिला बिग बॉसच्या घरातून तिला निरोप घ्यावा लागला आहे. ‘बिग बॉस’च्या येणाऱ्या भागात तेजस्विनी घरातून बाहेर पडणार आहे. तेजस्विनीला निरोप देताना घरातील सदस्यही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss marathi actor abhijit kelkar commented on tejaswini lonari exit spg