मराठी अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ‘बिग बॉस’ सीझन ४ मध्ये सहभागी झाल्यापासून ते घराघरांत पोहोचले. ‘बिग बॉस’च्या घरात त्यांनी ‘सातारचा बच्चन’ अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. अभिनयाबरोबरच ते अनेकदा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर बेधडक भाष्य करतात. राज्यात अलीकडेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. याप्रकरणी फेसबुक पोस्ट शेअर करत किरण मानेंनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : गेल्या २० वर्षांपासून संजय दत्त शोधतोय अमीषा पटेलसाठी जोडीदार; म्हणाला, “तुझ्या लग्नात…”

किरण मानेंची पोस्ट

माझ्या मराठा बांधवांनो… थेट बोलतो… आपल्याला धर्माच्या नावावर भडकवणारेच आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत हायेत. सावध होऊया. खरा शत्रू ओळखूया. आता तरी आपला खरा धर्म ओळखूया. धर्म संकटात आला की आपली मदत घेतली जाते आणि आपल्यावर हल्ला झाला की ‘एका जातीवर’ झाला असं समजलं जातं. आधी शेतकर्‍यांवर, मग वारकर्‍यांवर आनि आता या आंदोलनावर आघात झालाय. मराठा आरक्षण कुनाला नको हाय, ते शोधायला लै लांब नाय जावं लागनार. फक्त आपल्या धडावर आपलं डोकं असायला पायजे.

मनोज जरांगे पाटील…तुमच्याबद्दल काय बोलू? या भाकड काळात तुमी जे बोलताय ते बोलायला जिगरा लागतो! परवा आमच्या आयाबहिनींचं रक्त पाहिल्यापास्नं आमचंबी काळीज तुमच्याइतकंच तुटतंय… रक्त सळसळायला लागलंय… हात शिवशिवताहेत. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. फक्त सावध रहा. शत्रू कुटिल कारस्थानी आहे. सहकार्‍यांवर लक्ष ठेवा. आंदोलनात छुपी घुसखोरी करून आंदोलन हायजॅक करण्याचा इतिहास ताजा आहे. आता सावधपणे, भान ठेवून शेवटचा घाव घालूया सगळे मिळून. आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ‘एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन !’

अशा पोस्टवरनं जे कायम मला ट्रोल करतात त्यांना खरंतर मी एका केसाचीबी किंमत देत नाय. पन आज एक सांगतो, मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक हाय. कुनाच्या बापाला घाबरत नाय. काम काढून घेनन्याफिन्याला भेत नाय. मनगटाच्या बळावर मातीतनं पिकवून खानार्‍या शेतकर्‍याची औलाद हाय. कुनापुढं लाचार होनार नाय. समाजासाठी, गोरगरीबांसाठी आनि माझ्या शेतकर्‍यांसाठी वाट्टंल ती किंमत मोजून मी बोलनार. जीवात जीव असेपर्यन्त बोलत र्‍हानार.

आंदोलनकर्त्या भावाबहिनींनो, तुमच्या रक्ताच्या सांडलेल्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पायजे… न्याय मिळालाच पायजे.
जय शिवराय. जय भीम.किरण माने.

एकमराठालाख_मराठा

हेही वाचा : “आडनाव बदलायचा प्रश्नच नाही”, जेव्हा गौतमी पाटीलच्या वडिलांनी टीका करणाऱ्यांना दिलं होतं सडेतोड उत्तर

दरम्यान, जालना येथे २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. उपोषणकर्त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु होते. दोन वेळा झालेल्या चर्चेतूनही काही साध्य झालं नाही. पुढे पोलीस आणि आंदोलक यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यानंतर लाठीचार्जची घटना घडली. याच पार्श्वभूमीवर अभिनेते किरण मानेंनी ही पोस्ट शेअर करत स्वत:चं मत मांडलं आहे. याशिवाय सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss marathi fame kiran mane shared facebook on jalna maratha reservation protest sva 00