‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये स्पर्धकांमध्ये होणारे राडे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. किरणा माने व अपूर्वा नेमळेकर असो वा योगेश जाधव व प्रसाद जवादे यांच्यामधील वाद चर्चेत आले. आता घरामध्ये असाच एक वाद उफाळून निघणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शोचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या नव्या प्रोमोमध्ये धोंगडे व अपूर्वा नेमळेकरमधील वादाची झलक पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Big Boss Marathi 4 : …अन् चक्क विकास सावंतच्या अंगावर बसली अपूर्वा नेमळेकर, व्हिडीओ तुफान व्हायरल
‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून स्पर्धक अपूर्वा नेमळेकर चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे स्पर्धकांशी असलेले वाद तर विकोपाला पोहोचले. शिवाय तिची बदलेली भाषाही प्रेक्षकांना पटली नाही. आता एका टास्कदरम्यान अमृता धोंगडेने अपूर्वाला सुनावल्यानंतर प्रेक्षक तिचं कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ
घराच्या गार्डन परिसरामध्ये कोर्टाचा सेट तयार करण्यात आला आहे. यावेळी अमृता वकील बनून अपूर्वाशी संवाद साधताना दिसत आहे. यावेळी अपूर्वा म्हणते, “अपूर्वा जर आवाज चढवते तर दुसऱ्यांचं नीट ऐकूनही घेते.” अमृता तिला म्हणते, “जी मुलगी सदस्यांची लायकी काढते तर तिला मी कॅप्टन म्हणून का घेऊ.” यावर अपूर्वा म्हणते, “यावर दुनिया हसेल. मला हे कारण मान्यच नाही.”
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4 : “‘बिग बॉस’ मराठीच्या स्पर्धकांना वठणीवर आणणार” महेश मांजरेकरांचा व्हिडीओ व्हायरल
अमृता म्हणते, “मला ही योग्य वाटतच नाही. होय, मी तुझी लायकी काढणार.” प्रोमो व्हिडीओमधील अमृताचा नवा अवतार पाहून प्रेक्षकांनी मात्र तिचं कौतुक केलं आहे. अमृताचे मुद्दे बरोबर आहेत, अमृताचा नाद नाही करायचा, अमृता बेस्ट आहे असं प्रेक्षक कमेंटच्या माध्यमातून म्हणत आहेत. आता यापुढील भागात आणखी काय काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.