‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच आठवड्यामध्ये दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची शाळा घेतली. आठवड्याभरामध्ये घडलेल्या घटनांबाबत थेट प्रश्न विचारत ते स्पर्धकांना चांगलेच ओरडले. स्पर्धक अपूर्वा नेमळेकरला तर महेश मांजरेकर यांनी चांगलंच सुनावलं. आता या नव्या आठवड्यामध्ये घरात पुन्हा एकदा भांडण, राडे पाहायला मिळणार आहेत. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘बिग बॉस’च्या घरामध्ये स्पर्धकांना राग अनावर झाला की ते एकेरी भाषेवर उतरतात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. भांडण, राडे सुरु झाले की शो पाहण्यास प्रेक्षक अधिक उत्सुक होतात. आता असाच एक वाद चर्चेचा विषय ठरत आहेत. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये अपूर्वा नेमळेकर व किरण माने भांडताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

किरण मानेपासून या वादाला सुरुवात झाली असल्याचं प्रोमोमध्ये दिसून येत आहे. किरण “अरे तू शेपूट आहेस” असं विकास सावंतबद्दल बोलतात. यावर मेघा घाडगे चिडते आणि म्हणते, “असे शब्द बोलायची गरज आहे का?” किरण, मेघा, विकासमध्ये वाद सुरु असताना अपूर्वाची एण्ट्री होते. यावर अपूर्वा किरण यांना सुनावते की, “अरे ए किरण माने तो त्याचं बोलेल ना तुला काय करायचं आहे?”

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात येणार चक्क सुपरहिरो; घरातील सदस्यांची उडाली तारांबळ

अपूर्वाची ही एकेरी भाषा ऐकून सारेजण अवाक् झाले आहेत. शिवाय सोशल मीडियावरही तिला ट्रोल केलं जात आहे. इतकंच नव्हे तर अपूर्वासह मेघाबाबतही प्रेक्षक विविध प्रतिक्रिया देत आहेत. मेघा-अपूर्वाला सहन करणं अशक्य आहे असा प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Story img Loader