‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) मालिकेतील लीला आणि एजे या पात्रांनी प्रेक्षकांना भुरळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. लीलाचा वेंधळेपणा आणि एजेचे परफेक्ट असणे यांमुळे त्यांच्यात सतत कुरबुरी होताना दिसतात. लीलाच्या वेंधळेपणामुळे सतत काही ना काही घडत असते आणि त्यामुळे एजेच्या सुनांना लीला त्याच्यासाठी अयोग्य असल्याचे वाटते. त्यामुळे लीला जहांगीरदारांच्या घरातून बाहेर जावी यासाठी त्या कटकारस्थान करताना दिसतात. आता या सगळ्यावर मात करीत लीलाने तिची ‘सासूगिरी’ दाखवायला सुरुवात केल्याचे मालिकेत पाहायला मिळाले आहे. आता मात्र एजेवर संकट येणार असून, त्याला अटक होणार असल्याचे नवीन प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, श्वेता आणि तिची आई एजेच्या घरी आल्या आहेत. श्वेताची आई म्हणते, “तुमच्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय.” त्यानंतर “जर एजेंना माझ्याशी लग्न करायचं नसेल, तर मलासुद्धा जगण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये”, असे म्हणून श्वेता औषध पिते. ते पाहताच एजे ती औषधाची बाटली फेकतो. श्वेता पडत असताना एजे तिला धरतो. श्वेता म्हणते, “तुमच्याशी लग्न करता आलं नाही; पण तुमच्या मिठीत मरता येतंय मला.” त्यानंतर ते श्वेताला घेऊन जातात. एजेच्या घरी पोलिस येतात. आजी रडत आहे आणि ती दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांना समजावत आहेत. यादरम्यान, लीला तिच्या माहेरी आहे. पत्रकार तिला विचारतात, एजेमुळे एका मुलीने आत्महत्या केली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे आणि आता ते जेलमध्ये आहेत. यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे ऐकल्यानंतर तिला धक्का बसल्याचे दिसत असून, ती म्हणते की, एजेंना अटक झाली?

झी मराठी वाहिनीने नवरी मिळे हिटलरला मालिकेचा प्रोमो शेअर करताना, “एजेंना अटक होणार….?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, एजे आणि श्वेताचे लग्न ठरलेले असते. मात्र, लीलाची बहीण रेवतीला किडनॅप करून, तिला एजेबरोबर जबरदस्तीने लग्न करायला सांगितले जाते. लीला श्वेताला बेशुद्ध करून, स्वत: तिच्या जागी बसते आणि एजेबरोबर लग्न करते. त्यानंतर लक्ष्मी व सरस्वती यांच्या मदतीने श्वेता लीलाला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते; मात्र तसे घडताना दिसत नाही. आता मात्र श्वेताने उचललेल्या पावलामुळे एजेवर मोठे संकट आल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

आता लीला यातून कसा मार्ग काढणार आणि श्वेताने हे नाटक केले आहे का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big trouble for aj arrest due to shwetas that act navri mile hitlarla new twist nsp