गौतम विग बिग बॉस १६ मुळे चांगलाच चर्चेत आला होता. काही दिवसांपूर्वी त्याला या घरातून बाहेर पडावं लागलं. या कार्यक्रमात त्याने केलेल्या विधानांमुळे आणि त्याच्या वागण्यामुळे तो खूप ट्रोल झाला. रिअॅलिटी शोमध्ये तो सुरुवातीला सक्रिय दिसत होता पण नंतर त्याने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. सौंदर्या शर्माबरोबर रोमान्स करण्यात तो इतका व्यग्र झाला की त्याचं खेळातील लक्ष विचलित झालं. त्यावेळी त्यांचा तो रोमान्स प्रचंड व्हायरल झाला. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. त्याने त्याच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी त्याला ‘सौंदर्या’ म्हणत त्याच्यावर निशाणा साधला आहे.

गौतम विगने त्याच्या करिअरमध्ये खूप संघर्ष केला आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बिग बॉसच्या घरात असताना उघड केल्या आहेत. त्याला आता प्रसिद्धी मिळाली असली तरी तो ज्यासाठी या इंडस्ट्रीत आला होता, ते स्थान त्याला अजूनपर्यंत गाठता आलेलं नाही. आता ‘बिग बॉस १६’च्या घरातून बाहेर आल्यावर त्याने एक किलिंग फोटोशूट केलं आहे.

Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…

आणखी वाचा :Video: ‘मेरा दिल ये पुकारे…’ ट्रेंडच्या नादात माधुरी दीक्षितने केली पाकिस्तानी मुलीची कॉपी, नेटकरी संतापले

यामध्ये त्याने भरपूर मेकअप केला असून त्याने त्याच्या डोळ्यांना आयलायनरही लावलेलं दिसत आहे. या सगळ्यात त्याने दाढीही वाढवली आहे. यावेळी त्याने बिबट्याच्या प्रिंटचं जॅकेट घातलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss 16: करण जोहरवर भेदभाव केल्याचा आरोप, सलमान खानकडे सूत्रसंचालन द्या; नेटकऱ्यांची मागणी

त्याने कितीही स्टायलिश फोटोशूट केलं तरीही त्याचे हे फोटो नेटकऱ्यांना अजिबातच आवडलेले नाहीत. या फोटोंवर कमेंट्स करत नेटकरी त्याला चांगलंच ट्रोल करत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहीलं, ” आता फक्त लिपस्टिकची कमी आहे.” तर दूसरा नेटकरी म्हणाला, “मला माहित नव्हतं की भाऊ आयलायनरही लावतो.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “तू सौंदर्या २.० दिसत आहेस.” त्याचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Story img Loader