‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वामधून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. पारस छाबरा या पर्वाद्वारे घराघरांत पोहोचला. मध्यंतरी पारस त्याच्या वाढलेल्या वजनामुळे चांगलाच चर्चेत आला होता. वजन वाढल्याने अनेक प्रकल्प त्याच्या हातातून गेल्याचे त्याने सांगितले होते. यानंतर अभिनेत्याने वजन कमी करण्यास सुरुवात केली. नुकताच पारसने त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा : “आलियाने एकाच आठवड्यात दोनदा लग्न…”, दिग्दर्शक करण जोहरचे वक्तव्य चर्चेत
पारस छाबराने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आधी’ आणि ‘आता’ असे कॅप्शन देत दोन फोटो शेअर केले आहेत. आधीच्या फोटोमध्ये पारसचे वजन १२५ किलो होते. तर आताच्या नव्या फोटोमध्ये पारसने २५ किलो वजन कमी करून आता सध्या त्याचे वजन १०० किलो झाल्याचे म्हटले आहे. आधीच्या फोटोपेक्षा पारस आता एकदम फिट दिसत आहे.
हेही वाचा : धार्मिक श्रद्धेवरून ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, “समस्या असतील तर…”
पारस छाबरा हे दोन फोटो शेअर करत लिहितो, “१२५ ते १०० किलो…आतापर्यंतचा वजन कमी करण्याचा अनुभव फार चांगला होता. आता मला पुढील ध्येय गाठण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. या संपूर्ण प्रवासात माझ्या फिटनेस ट्रेनरही माझे कौतुक केले. मानसिकता, जीवनशैली, आहारात बदल करून मी हा टप्पा गाठला. भविष्यात आणखी फिट होण्यासाठी मी जरुर प्रयत्न करेन.” अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान, पारस छापरा बिग बॉसच्या १३ व्या पर्वामुळे चर्चेत आला होता. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना त्याची वेगळी बाजू पाहायला मिळाली. यापूर्वी त्याने स्पिल्ट्सव्हिला शोचे पाचवे पर्व जिंकले होते. तसेच काही म्युझिक व्हिडीओमध्ये त्याने काम केले आहे.