‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक जोड्या जुळतात. ज्या शोबाहेर आल्यानंतर आणखी दृढ झालेल्या पाहायला मिळतात. पण कालांतराने काही जोड्यांचं नातं संपुष्टात येतं. गेल्या वर्षाच्या अखेरीस ‘बिग बॉस सीझन १३’ लोकप्रिय जोडी हिमांशी खुराना आणि आसिम रियाज यांचं नातं संपुष्टात आलेलं पाहायला मिळालं. धर्माच्या कारणांमुळे दोघांनी वेगळं व्हायचं ठरवलं. आता ‘बिग बॉस’मध्ये जमलेली आणखी जोडी विभक्त झाली आहे.

‘बिग बॉस सीझन १४’मध्ये जमलेली एजाज खान आणि पवित्र पुनिया या जोडीचा आता ब्रेकअप झाला आहे. ‘बिग बॉस’मध्ये असताना सुरुवातीला दोघांचे टोकाचे वाद पाहायला मिळाले. पण त्यानंतर शो संपताना दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालं. दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं होतं. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. एवढंच नाहीतर शोबाहेर आल्यानंतर दोघं एकत्र राहत होते. अनेक कार्यक्रमाला एजाज व पवित्राची एकत्र उपस्थिती असायची. सोशल मीडियावर दोघं एकमेकांचे फोटो, व्हिडीओ शेअर करायचे. त्यामुळे दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अशातच आता ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे.

aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
ankita walawalkar aka kokan hearted girl first kelvan
‘कोकण हार्टेड गर्ल’ची लगीनघाई! अंकिता-कुणालचं पार पडलं पहिलं केळवण, फोटो आला समोर, लग्नपत्रिका पाहिलीत का?
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”

हेही वाचा – अंकिता लोखंडेचं कंगना रणौतशी नातं आहे बहिणीसारखं, अभिनेत्री म्हणाली, “बिग बॉसच्या घरातील माझी-विकीची भांडणं पाहून तिला…”

दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इ-टाइम्स’शी बोलताना पवित्रा पुनिया म्हणाली, “५ महिन्यांपूर्वीच आम्ही वेगळे झालो आहोत. एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होतो. पण गेल्या महिन्यात एजाजने हे अपार्टमेंट सोडलं आणि तो दुसरीकडे राहायला गेला आहे.”

हेही वाचा – Bhool Bhulaiyaa 3 मध्ये मंजुलिका परत येणार, कार्तिक आर्यनने अभिनेत्रीचं नाव अन् प्रदर्शनाची तारीख केली जाहीर

पुढे पवित्रा म्हणाली, “प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट कालावधी असतो. कोणतीही गोष्ट तुम्हाला आयुष्यभर पुरत नाही. अगदी तसंच नातेसंबंधाच्या बाबतीत आहे. प्रत्येक नात्याची एक विशिष्ट वेळ व मर्यादा असतात. एजाज व मी काही महिन्यांपूर्वी वेगळे झालो आहोत. त्याला पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून नेहमी शुभेच्छा देईन. मी त्याचा खूप आदर करते. पण आमचं हे नातं टिकू शकलं नाही.” याशिवाय एजाज म्हणाला, “पवित्राला खूप सारं प्रेम आणि यश मिळो, अशी माझी इच्छा आहे. मी तिच्यासाठी नेहमी प्रार्थना करेन.”

Story img Loader