स्वत:चं घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. घराचे स्वप्न पूर्ण करणे हा आनंदाचा क्षण असतो. आता गायक राहुल वैद्यचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याने मुंबईत अपार्टमेंट घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.

‘बिग बॉस १४’फेम गायक राहुल वैद्यने घेतले मुंबईत घर

इन्स्टंट बॉलीवूडने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “गायक राहुल वैद्य एका लक्झरिअस अपार्टमेंटचा मालक झाला आहे. राहुल वैद्यने मुंबईतील वांद्रा पश्चिममध्ये डीएलएच सिग्नेचर (DLH Signature)मध्ये अपार्टमेंट विकत घेतले आहे. ३११० स्क्वेअर फुटांचे हे अपार्टमेंट २६ कोटी रुपयांचे असल्याचे म्हटले जात आहे.

sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
avadhoot gupte marathi singer buy new apartment in khar mumbai area
अवधूत गुप्तेने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! किंमत तब्बल ‘इतके’ कोटी, १६ व्या मजल्यावर आहे फ्लॅट
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
bigg boss marathi meenal shah built luxurious bungalow in goa
Bigg Boss फेम अभिनेत्रीने गोव्यात बांधला भलामोठा आलिशान बंगला! ‘ड्रीम हाऊस’ म्हणत शेअर केले फोटो; म्हणाली, “हा प्रवास…”
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ

राहुल वैद्यने इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेली ही पोस्ट स्टोरीवर शेअर केली आहे. ही स्टोरी शेअर करताना राहुल वैद्यने म्हटले, “देवाच्या आशीर्वादाने, पालकांच्या, मुलीच्या आणि पत्नीच्या पाठिंब्याने हे शक्य झाले आहे.” आता राहुल वैद्य त्याच्या नव्या घराची झलक कधी दाखवणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

इन्स्टाग्राम

राहुल वैद्यची पत्नी दिशा परमार ही अभिनेत्री आहे. २०२१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. विविध हिंदी मालिकांमधून तिने अभिनय करत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या मालिकेतील तिची पंखुडीची भूमिका प्रेक्षकांना आवडल्याचे पाहायला मिळाले. ‘वो अपना सा’, ‘बडे अच्छे लगते है’ या मलिकेतील तिच्या भूमिकांना मोठी पसंती मिळली होती.

राहुल वैद्य इन्स्टाग्राम

राहुल वैद्य त्याच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो ‘बिग बॉस १४’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या पर्वात त्याने त्याच्या खेळातून प्रेक्षकांचे मन जिंकले होते. मात्र, तो या पर्वाचा उपविजेता ठरला. बिग बॉस १४ ची विजेती अभिनेत्री रूबिना दिलैक ठरली होती.

हेही वाचा: “जेव्हा मी कुठल्याही गणपतीकडे बघतो; त्याचा हात…”, काय म्हणाला प्रसाद ओक?

दरम्यान, राहुल वैद्य सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या कुटुंबाबरोबरचे व्हिडीओदेखील शेअर करतो. चाहते त्याच्या या व्हिडीओंवर प्रतिक्रिया देताना दिसतात. आता त्याच्या नवीन घरामुळे राहुल वैद्य चर्चेत आला आहे.

Story img Loader