हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा व ‘बिग बॉस १४’ची विजेती रुबिना दिलैक (Rubina Dilaik) गेल्यावर्षी आई झाली. २७ नोव्हेंबर २०२०३ रोजी रुबिनाने दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला. एधा व जीवा असं दोन लेकीचं अभिनेत्रीने नाव ठेवलं. रुबिनाने नुकत्याच एका मुलाखतीमधून गरोदर असताना झालेल्या जीवघेण्या अपघाताविषयी सांगितलं. तसंच यावेळी नवरा अभिनवने कसा पाठिंबा दिला, याबद्दल रुबिना बोलली.
रुबिना दिलैकचा गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत गाडी अपघात झाला होता. या अपघातातून रुबिनाच्या मुली थोडक्यात बचावल्या. याविषयी अभिनेत्री ‘द सनी जी शो’मध्ये सांगताना म्हणाली, “अपघात झाला त्यावेळेस मी गर्भवती असल्याचं जाहीर केलं नव्हतं. जेव्हा माझ्याबरोबर हे सर्व घडलं होतं तेव्हा मी तीन तास रडत होती. यावेळेस अभिनव माझ्याबरोबर होता. जेव्हा माझ्या आयुष्यात असे प्रसंग घडतात तेव्हा मला अभिनवची खूप गरज लागते आणि ईश्वराच्या कृपेने तो तिथेच होता. तो तीन तास आजूबाजूला सोनोग्राफी सेंटर शोधत होता.”
हेही वाचा – आनंदी-सार्थकच्या संगीत सोहळ्यात ‘ठरलं तर मग’मधील सायली-अर्जुन ‘या’ गाण्यावर डान्स करणार, पाहा व्हिडीओ
पुढे रुबिना म्हणाली, “ते तीन तास माझ्यासाठी तीन वर्ष असल्यासारखे होते. या अपघातामुळे मला मोठा धक्का बसला होता. मला माझ्या जीवाची अजिबात परवा नव्हती. तर मला लेकींना गमावण्याची भीती सतावत होती. एखाद्याला गमावण्याची भीती काय असते, याची जाणीव मला त्यादिवशी झाली. अपघात झाल्यापासून ते सोनोग्राफीपर्यंत मी फक्त रडत होते.”
हेही वाचा – दोन झुरळांमुळे नाटकाच्या चालू प्रयोगात उडाली तारांबळ, अतुल परचुरेंनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले…
दरम्यान, रुबिनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ’छोटी बहू’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने एका आदर्श सूनेची भूमिका साकारली होती. तसेच तिला ‘शक्ति अस्तित्व के एहसास’ या मालिकेच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.