बिग बॉसचा १६ वा सीझन आता सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. या सीझनमध्ये नव्या बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात आता प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. घरात काही सदस्यांची एकमेकांशी कनेक्शन पाहायला मिळत आहेत. शालीन भानोत- टीना दत्ता, सौंदर्या शर्मा- गौतम विग यांच्यानंतर शिव ठाकरे आणि सुंबुल तौकीर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता या सगळ्यांमध्ये आणखी एका जोडीची भर पडली आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असलेला बिग बॉस कंटेस्टंट अब्दू रोजिक बिग बॉसच्या घरातील एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे.

बिग बॉसमध्ये अब्दू रोजिकची सर्वांशीच चांगली मैत्री असल्याचं दिसून येते. पण तो सर्वाधिक वेळा प्रियांका चाहर चौधरी आणि निमृत कौर अहलुवालिया यांच्याशी मस्ती करताना दिसतो. या दोन्ही अभिनेत्रींशी त्याचं खूप चांगलं बॉन्डिंग असल्याचं दिसून येते. अशात आता अब्दू रोजिकने सर्वांसमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. अब्दू रोजिक स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे.

आणखी वाचा- Video : वीणा जगतापला डेट केल्यानंतर ‘बिग बॉस १६’मध्ये शिव ठाकरेला मिळाली नवी गर्लफ्रेंड? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

निर्माता दिग्दर्शक साजिद खान आणि शिव ठाकरे अब्दू रोजिकला नेहमीच निमृत कौरच्या नावाने चिडवताना दिसतात. अशात आता अब्दू रोजिकने त्याला निमृत कौर आवडत असल्याची कबुली दिली आहे. सुरुवातीला शिव आणि साजिद अब्दूला चिडवत असतात आणि त्याला विचारतात की, त्याला निमृत आवडते का? त्यावर तो काहीच प्रतिक्रिया देत नाही. पण नंतर जेव्हा शिव त्याला विचारतो की, “निमृतला पाहिल्यानंतर तुझ्या पोटात बटरफ्लाइज येतात का?” तर तो यावर लाजून “हो” असं उत्तर देतो. यावर शिव त्याला मस्करीत म्हणतो, “मुलगा तरुण झाला आहे.”

आणखी वाचा- Big Boss Marathi 4 : …अन् चक्क विकास सावंतच्या अंगावर बसली अपूर्वा नेमळेकर, व्हिडीओ तुफान व्हायरल

दरम्यान अब्दू रोजिक बिग बॉस १६ मधील सर्व प्रेक्षकांचा आणि सलमान खानचाही आवडता स्पर्धक आहे. त्याला देशभरातून भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. एवढंच नाही तर बिग बॉसमधील सदस्यही त्याला खूप जीव लावताना दिसतात. घरातील प्रत्येक सदस्याबरोबर त्याचं चांगलं बॉन्डिंग असलेलं दिसून येतं.

Story img Loader