‘बिग बॉस १६’चा महाअंतिम सोहळा फेब्रुवारी महिन्यामध्ये पार पडणार आहे. त्यापूर्वी घरातील सदस्यांमध्ये टॉप पाचमध्ये पोहोचण्यासाठी चढा-ओढ सुरू आहे. शिवाय हा खेळ आणखीनच रंगात आला आहे. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, साजिद खान, टीना दत्ता, सुम्बुल तौकीर यांसारख्या सदस्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. तर अब्दू रोजिकने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच साताऱ्यात पोहोचलेल्या किरण मानेंची जंगी मिरवणूक, म्हणाले, “डोळ्यांत पाणी…”
‘बिग बॉस १६’बाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. ‘बिग बॉस १६’च्या महाअंतिम सोहळ्यापूर्वी एका सदस्याला या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. ‘बिग बॉस १६’चा खेळ कोणता स्पर्धक अर्धवट सोडणार हे ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसेल. पण काही कारणास्तव या सदस्याला हा कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे.
‘बिग बॉस १६’च्या घरामधून कोण बाहेर पडणार?
‘आजतक’च्या वृत्तानुसार, अब्दू रोजिक हा खेळ अर्धवट सोडून जाणार आहे. यामागचं कारणही तसंच आहे. त्याचे काही प्रोजेक्ट आहेत. ते अब्दूला घराबाहेर येऊन दिलेल्या वेळेत पूर्ण करायचे आहेत. त्यामुळेच तो हा खेळ अर्धवट सोडणार आहे. पण हा त्याचा या घराला शेवटचा निरोप असणार आहे.
आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”
काही दिवसांपूर्वीही अब्दूने ‘बिग बॉस १६’मधून अचानक एक्झिट घेतली होती. पण प्रेक्षकांचं त्याला मिळत असलेलं प्रेम पाहता तो पुन्हा या घरात आला. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्याने अधिकाधिक मेहनत करत सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं आहे. तसेच त्याचे लाखोंच्या घरामध्ये चाहते आहेत.