‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वात या आठवड्यामध्ये स्पर्धकांचे कुटुंबीय घरात आल्याचं पाहायला मिळालं. अब्दू रोजिक वगळता सर्वच सदस्यांच्या घरून कुणीतरी बिग बॉसमध्ये आलं होतं. बाहेरुन आलेले कुटुंबीय घरात राहिले आणि त्यांनी स्पर्धकांशी संवाद साधला. त्यांनी बाहेर दिसणाऱ्या अनेक गोष्टीही संबंधित सदस्यांना सांगितला. स्पर्धक अर्चना गौतमचा भाऊ गुलशन देखील बिग बॉसच्या घरात आला होता. घराबाहेर पडल्यावर त्याने सलमान खान आणि एमसी स्टॅनने अर्चनाला दिलेल्या शिव्यांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Vaalvi Movie review : मराठी प्रेक्षकांचं डोकं पोखरणारा स्वप्नील-सुबोधचा ‘वाळवी’ पाहायलाच हवा, कारण…

‘इंडिया टुडे’शी साधलेल्या संवादात गुलशन म्हणाला, ” एमसी स्टॅन खूप चुकीचं बोलला होता! प्रेक्षकांनाही ते चुकीचं वाटलं. त्याचं बोलणं ऐकून प्रेक्षकांनाही दुःख झालं. खरं तर त्याने इतकं वाईट बोलाव, असं अर्चना काहीच म्हणाली नव्हती. पण तरीही तो बोलला, हे पाहून मला खूप वाईट वाटलं होतं.”

Video : …अन् मुंबईच्या रस्त्यांवर ‘बिग बॉस’ची ट्रॉफी घेऊन नाचला अक्षय केळकर, मित्र-मंडळींचाही डान्स व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, यावेळी गुलशनने सलमानच्या एका टिप्पणीवरही प्रतिक्रिया दिली. आपण दया दाखवल्यानं अर्चना शिवशी झालेल्या भांडणानंतर परत येऊ शकली होती, असं सलमान म्हणाला होता. त्यावर गुलशन म्हणाला, “अर्थात, मला वाईट वाटलं. कारण ती लोकांनी दया दाखवल्यानं परत आलेली नाही. तिने आतापर्यंत जे काही केलंय, ते तिने स्वतः केलं आहे. ती अजूनही या खेळात आहे कारण ती काहीतरी करत आहे. ती प्रेक्षकांशी मनाने जोडली गेली आहे. लोक तिला पसंत करत आहेत. सर्व ठिकाणी अर्चना दिसत आहे. तिच्यात काहीतरी आहे, म्हणूनच ती लोकांना आवडत आहे ना. ती एक सामान्य व्यक्ती आहे आणि सेलिब्रिटी किंवा टीव्ही स्टार नाही. आम्ही एका सामान्य कुटुंबातील आहोत आणि प्रेक्षकांमुळेच ती या शोमध्ये आली आहे,” असं गुलशनने सांगितलं.

अमृता फडणवीसांचा शिव ठाकरेला पाठिंबा, म्हणाल्या “महाराष्ट्राचा..”

दरम्यान, ‘बिग बॉस १६’ चा कालावधी काही दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे शोचा ग्रँड फिनाले फेब्रुवारी महिन्यात होईल. सध्या घरात शिव ठाकरे, प्रियांका चौधरी, अर्चना गौतम, सौंदर्या शर्मा, साजिद खान, अब्दू रोजिक, टीना दत्ता, शालीन भानोत, श्रीजिता डे, एमसी स्टॅन आणि सुंबूल तौकीर खान हे सदस्य आहेत.