‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये स्पर्धक अर्चना गौतम तुफान राडा करत आहे. घरातील बऱ्याच सदस्यांबरोबर तिचं भांडण झालं. आता अर्चनाने एक नवा मुद्दा मांडला आहे. गेल्या आठवड्यामध्ये अर्चनाने शिव ठाकरे व साजिद खानच्या ताटामधील चपाती दोघंही जेवत असताना उचलली. आता अर्चनाने पुन्हा एकदा चपातीवरुनच घरामध्ये भांडणाला सुरुवात केली आहे.
आणखी वाचा – पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…
हिंदी कलर्स वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्चना चपातीवरुन घरातील सदस्यांशी भांडण करताना दिसत आहे. घरातील चपात्यांचा नेहमीच नाश होतो याबाबत अर्चना सगळ्यांनाच सुनावत आहे.
अर्चना म्हणते, “तुम्ही चपात्या राखून ठेवता. पण तुम्ही त्या राहिलेल्या चपात्या कशा ठेवता हे एकदा बघा. काही लोकांना चपाती खायला मिळत नाही.” भडकलेल्या अवस्थेमध्येच अर्चना स्वयंपाक घरामध्ये जाते आणि किचनमध्येच चपात्या पसरवून ठेवते.
रागामध्ये म्हणते, “ज्या सात चपात्या मी किचनमध्ये पसरवून ठेवल्या आहेत त्या जाऊन पाहा. ज्या दिवसांमध्ये तुम्ही सुक्या चपात्या खात होता ते दिवस विसरलात. उद्या शिळं जेवण सगळं संपवा तरच तुम्हाल दुसरं ताज जेवण मिळेल. पण जेवणाचा नाश होत आहे हे मी सहन करू शकत नाही.” अर्चनाचा हा व्हिडीओ पाहून तू योग्य तेच करत आहेस म्हणत प्रेक्षक तिचं कौतुक करत आहेत.