‘बिग बॉस १६’ या बहुचर्चित शोमधील काही स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये कायमचं घर केलं. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे अब्दू रोझिक. अब्दूने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आणि अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर तर अब्दूचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. अब्दू उंचीने जरी लहान असला तरी त्याची प्रसिद्धी जगभरात आहे. त्याची उंची ३ फूट १ इंच इतपत आहे. आता अब्दूने सगळ्यांना एक गुड न्यूज दिली आहे.
अब्दूची उंची इतकी लहान कशी? असा प्रश्न सगळ्यांनाच असेल. तर अब्दूला एका आजाराचा सामना करावा लागला होता. या आजारामुळे त्याची उंची वाढली नाही. शिवाय तेव्हा कुटुंबियांकडेही फारसे पैसे नसल्यामुळे अब्दूच्या आजारावर उपचार झाले नाही. पण आता अब्दूची उंची हळूहळू वाढत आहे. याबाबत त्याने स्वतःच खुलासा केला आहे.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
अब्दूने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या गाडीमध्ये बसलेला दिसत आहे. अब्दू फोटो शेअर करत म्हणाला, “तुम्हाला काही फरक दिसत आहे का? डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की, तुझी उंची कधीच वाढणार नाही. माझ्या शरीरामध्ये हार्मोनची वाढही होत नव्हती”.
आणखी वाचा – Video : महेश मांजरेकरांच्या लेकाचं हॉटेल पाहिलंत का? ‘या’ खास पदार्थांचा खवय्यांना आस्वाद घेता येणार
“पण देवाच्या कृपेने एक चमत्कार घडत आहे. तुमचं प्रेम, पाठिंबा आणि प्रार्थनांमुळे माझी उंची आता हळूहळू वाढत आहे”. अब्दूची ही पोस्ट पाहून त्याचे चाहतेही खूश झाले आहेत. देवकृपेने तुझी उंची वाढत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे, काही वेळा आपल्याला फक्त आशिर्वादांचीच गरज असते, आम्ही तुझ्यासाठी खूप खुश आहोत अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.