‘बिग बॉस १६’ शो दिवसेंदिवस रंजक ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच अंकित गुप्ताला ‘बिग बॉस १६’च्या घरामधून बाहेर पडावं लागलं. या शोमध्ये अंकित अगदी शांत दिसत होता. वाद, भांडणांपासूनही अंकित लांब राहिला. त्याचं या घरात प्रियांका चौधरीशी असणारं नातं प्रचंड गाजलं. अंकित व प्रियांकाच्या रिलेशनशिपच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या. पण एरव्ही अगदी शांत असणाऱ्या अंकितचा एक वेगळाच अवतार आता समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – तीन वर्षांमध्येच मोडला संसार, आता ४३व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याने मराठमोळ्या मुलीशी केलं दुसरं लग्न, व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस १६’च्या घरामधून बाहेर आल्यानंतर अंकितचं खरं रुप बाहेर आलं असल्याचं नेटकरी सतत म्हणत आहेत. याचं कारणही अगदी तसंच आहे. ‘बिग बॉस १६’च्या फॅन पेजवर अंकितचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तो बेभान होऊन नाचताना दिसत आहे.

अंकितचा हा व्हिडीओ एका पबमधील आहे. तर या व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस १६’चा आणखी एक सदस्य गौतम विगही दिसत आहे. अंकित ज्याप्रकारे डान्स करताना दिसत आहे ते पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. अंकितचं हे बदलेलं रुप पाहता अनेकांनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची कौतुकास्पद कामगिरी, बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकत चार दिवसांतच कमावले इतके कोटी

अंकित दारू पिऊन नाचत आहे, प्रियांका नसल्यामुळे अंकित आनंदाने नाचत आहे, अंकितला प्रियांकापासून स्वतंत्र मिळालं आहे अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर अंकितला या नव्या रुपात पाहून गौतमही थक्क झाला आहे.