‘बिग बॉस’ हिंदीचं १६वं पर्व चांगलंच गाजलं. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्य वाद-विवाद, मैत्री, प्रेम पाहायला मिळालं. एमसी स्टॅन ‘बिग बॉस १६’चा विजेता ठरल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबरीने शिव ठाकरे, एमसी स्टॅन, निमृत कौर, साजिद खान, अब्दू रोझिक, सुम्बुल तौकिर यांची घरात एक मंडली तयार झाली. पण यामध्ये शिव व निमृतच्या नात्याबाबत चर्चा रंगत होत्या.

आणखी वाचा – गर्लफ्रेंडचा छळ, मारहाण, गाण्यांमध्येही शिवीगाळ अन्…; पुण्यात राहणाऱ्या एमसी स्टॅनचं आधी कसं होतं आयुष्य?

मंडलीमध्ये शिव व निमृत यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. निमृत जेव्हा घराबाहेर पडली तेव्हा शिव अगदी ढसाढसा रडला होता. या दोघांमध्ये प्रेमाचं नातं आहे अशा बऱ्याच चर्चा रंगल्या. याबाबत आता निमृतने भाष्य केलं आहे. शिव चांगला मित्र असल्याचं निमृतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये निमृतला शिव व तिच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “मी घरामधून जेव्हा बाहेर आले तेव्हा सगळे शिवृतसाठी आम्ही खूश आहोत असं म्हणत होते. पण मी शिवला डेट करतच नाही. आमच्यामध्ये मैत्रीचं नातं आहे.” शिवाय निमृत स्वतः एका रिलेशनशिपमध्ये आहे.

आणखी वाचा – “आज त्याची आई नाही याचं…” समीर चौघुले यांच्या वडिलांनी सांगितला ‘तो’ प्रसंग, अभिनेताही झाला भावूक

निमृतने तिच्या बॉयफ्रेंडचं नाव न घेता सांगितलं की, “इतर सहकलाकारांबरोबर माझं नाव जोडलं गेलं. नात्यात विश्वास नसल्यामुळे मी इतर अत्यंत वाईट रिलेशनशिपचाही सामना केला आहे. पण माझ्या आता असलेल्या नात्यामध्ये तेवढा समजुतदारपणा आहे. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये जे काही झालं त्यामुळे तो दुखावला. पण नात्यामध्ये समजुतदारपणा असल्यामुळे काहीच अडचण नाही. गेले अडीच वर्ष मी रिलेशनशिपमध्ये आहे.” म्हणजेच शिव व निमृतमध्ये फक्त मैत्री असल्याचं यामधून सिद्ध होतं.

Story img Loader