‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये उत्तम खेळ खेळत मराठमोळ्या शिव ठाकरेने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. शिवची घरातील इतर सदस्यांशी असलेली मैत्रीही प्रचंड गाजत आहे. शिवाय वादादरम्यान तो स्वतःवर करत असलेलं नियंत्रणही कौतुकास्पद असल्याचं बोललं जातं. शिवने ‘बिग बॉस १६’मध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगताप बाबतही भाष्य केलं होतं. यावर आता त्याच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांवर समीर चौघुलेंनी सोडंल मौन, म्हणाले, “कार्यक्रम बंद…”

शिव त्याच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला. ‘बिग बॉस मराठी’मध्ये त्याची मैत्री अभिनेत्री वीणा जगतापशी झाली. या दोघांच्या नात्याला या घरामध्येच सुरुवात झाली. या दोघांच्या ब्रेकअपच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या.

पण अजूनही शिवच्या हातावर वीणाचा टॅटू आहे. याबाबतच त्याच्या आईने आता भाष्य केलं आहे. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवच्या आईने त्याच्या व वीणाच्या नात्यावर भाष्य केलं. शिवच्या हातावर असलेल्या टॅटूबाबत विचारताच शिवची आई म्हणाली, “हा पूर्णपणे त्याचा विषय आहे.”

आणखी वाचा – “आम्ही दोघंही सिगरेट व दारू…” रितेश देशमुखने खासगी आयुष्याबाबत केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

“मला याबाबत काही बोलायचं नाही. तो आतापर्यंत मोकळेपणाने राहिला व वावरला आहे. त्याला त्याचं स्वतंत्र आहे. तसेच तो त्याचे निर्णय स्वतः घेत आहे.” शिवच्या आईने या दोघांच्या नात्याबाबत बोलणं टाळलं आहे. तसेच शिवच्या आईने त्याच्या खेळाचंही यावेळी भरभरून कौतुक केलं.