‘बिग बॉस १६’ या बहुचर्चित शोचं विजेतेपद कोण पटकावणार? याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा रंगत होत्या. शिव ठाकरे, एमसी स्टॅन दोघं या शोचे टॉप ३ स्पर्धक होते. शिवाय घरातील मंडलीचे दोन सदस्य फिनालेला पोचल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली होती. अखेरीस रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तर शिव या शोचा उपविजेता ठरला.
‘बिग बॉस १६’चा उपविजेता ठरल्यानंतर शिवने पहिल्यांदाच सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर केली आहे. शिवची ही पोस्ट खास ठरली आहे. त्याने या पोस्टद्वारे एमसी स्टॅनबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने एमसी स्टॅनला उचलून घेतलं आहे. शिवाय त्याचं अभिनंदनही केलं आहे.
शिव ठाकरेची पहिली पोस्ट
‘बिग बॉस १६’चा विजेता एमसी स्टॅन असल्याचं जाहिर झाल्यानंतर शिवने त्याला मंचावरच उचलून घेतलं. यावेळी मित्र विजेता ठरल्यानंतर शिवचा आनंदही गगनात मावेनासा झाला. शिव म्हणाला, “अखेरीस आम्हीच जिंकलो. एमसी स्टॅनने ट्रॉफी जिंकली आणि ‘बिग बॉस १६’चा विजेता ठरला. तुझं खूप अभिनंदन. हक से मंडली. ट्रॉफी मंडळीच घेऊन आली”.
शिवच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये सलमानही दोघांकडे अगदी आनंदाने बघताना दिसत आहे. शिवच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटद्वारे व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. शिव तूसुद्ध विजेताच आहेस, तू खरी मैत्री निभावली, तुम्हा दोघांचेही अभिनंदन अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर शिव व एमसी स्टॅनच्या मैत्रीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.