‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद शिव ठाकरेने पटकावलं. ‘बिग बॉस’मुळेच शिव नावारुपाला आला. गेली काही वर्ष हिंदी ‘बिग बॉस’मध्ये येण्याचं त्याचं स्वप्न होतं. तेही त्याने पूर्ण केलं. मात्र हिंदी ‘बिग बॉस’च्या विजेतेपदापासून तो दूर राहिला. मात्र आज शिवने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. एमसी स्टॅन ‘बिग बॉस १६’चा विजेता असला तरी शिवलाही प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत.
आणखी वाचा – “आमच्या दोघांमध्ये…” शिव ठाकरेबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर निमृत कौरने सोडलं मौन
पण हिंदी ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी शिवला हिणवण्यात आलं होतं. यावरुनच त्याने आता भाष्य केलं आहे. मराठीनंतर हिंदीमध्ये ‘बिग बॉस’ करण्यावरुन त्याला काही जणांनी बरेच प्रश्न विचारले. पण त्यावेळी त्याने या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं. आता यश मिळवल्यानंतर शिवने याबाबत सांगितलं.
आणखी वाचा – “आता त्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही” ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद मिळाल्यानंतर कोणावर भडकला एमसी स्टॅन?
शिव म्हणाला, “मला दोन ते तीन गोष्टींचं खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा मला लोकांनी म्हटलं होतं की, मराठीमध्ये तर ठिक आहे पण हिंदीमध्ये तुझं कसं होणार. हिंदीमध्ये सगळं वेगळं असतं. लोक वेगळे असतात. पण त्यावेळी मी त्यांना उत्तर दिलं नाही. कारण कोणीही असलं तरी समोरची व्यक्तीही माणूसच असणार आहे. ही माणसं काही वेगळी नसणार.”
“रोडिजमध्येही मी होतोच. मी तिथेही शेवटपर्यंत पोहोचलो होतो. ‘बिग बॉस’मध्येही गेलो. तर शिव ठाकरेने थोडी थोडी सगळ्यांची वाट लावली हे म्हणावच लागेल.” शिवने स्वतःच्या हिंमतीवर कलाक्षेत्रात त्याचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आता शिव आणखीन कोणत्या शोमध्ये दिसणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.