सध्या टेलिव्हिजनचा जगतात एकच चर्चा आहे ती म्हणजे ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाची, योगायोग म्हणजे हिंदी आणि मराठी भाषेत एकाच वेळी हे पर्व सुरु होत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता अफाट आहे. या कार्यक्रमाचे चाहते देशभरातच नव्हे तर जगभरात आहेत. हिंदी बिग बॉसबद्दल एक नवी बातमी आली आहे. बिग बॉस हिंदीचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. ज्यात बिग बॉसने सांगितले आहे की ‘कर्णधाराची ही जबाबदारी आहे की प्रत्येक स्पर्धकाने आदेशाचे पालन करावे. तसेच सूचनांचे कर्तव्यपूर्वक पालन केले पाहिजे. जर कर्णधार ही जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरला तर त्याला पदावरून काढण्यात येईल’.
बिग बॉस प्रीमियरच्या भागात निमृत कौर अहलुवालिया हिच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तिला इतर स्पर्धकांना बेड वाटप करण्याचे टास्क दिले होते. निमृतने स्पर्धकांनाशी जुळवून घेत आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडली. यानंतर बिग बॉसने तिला कॉन्फेशन रूममध्ये बोलावले. आणि तिला तिची रणनीती बदलण्यासाठी विचारले अन्यथा बिग बॉस तिला कर्णधारपदावरून दूर करेल. बिग बॉसने घोषणा केली की, वेकअप अलार्मची प्रथा बंद करणार, बिग बॉसमध्ये अशी प्रथा होती की स्पर्धकांना जागे करण्यासाठी मोठ्या आवाजात गाणी लावली जात असत.
अर्जुन कपूरशी लग्न कधी करणार? मलायका म्हणाली “मी या प्रश्नाचे उत्तर… “
बिग बॉस हाऊसमध्ये यंदा सगळं नेहमीपेक्षा वेगळं असणार आहे. जसं की ४ बेडरूम, बिग बॉसचं स्वतः खेळणं आणि नो रुल पॉलिसी असं बरंच काही. मागच्या १२ वर्षांपासूनची परंपरा सलमान खान पुढे चालवणार असून यंदाही तोच होस्टिंग करताना दिसणार आहे. या शोसाठी सलमानने यंदा १००० कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र बीबी प्रेस मीटिंगमध्ये सलमानने हे नाकारलं होतं.
यंदा बिग बॉसच्या घरात, साजिद खान, टीना दत्ता, शालीन भनोट, मान्या सिंह, सौंदर्या शर्मा, निम्रत कौर, अंकित गुप्ता, प्रियंका चाहर चौधरी, सुंबुल तौकीर खान, श्रीजिता डे, गौतम सिंह विग, गोरी नागोरीस, शिव ठाकरे, अब्दु रोजिक सहभागी होणार आहेत.