सध्या सर्वत्र ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाची चर्चा आहे. ‘बिग बॉस’च्या इतर पर्वांप्रमाणे या पर्वामध्येही भांडणं, मारामाऱ्या, रुसवे-फुगवे पाहायला मिळत आहेत. हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीमध्ये अव्वल स्थानावर आहे. शोचे नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. नुकताच या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. या व्हिडीओमध्ये घरातील सदस्य कॅप्टन अब्दू रोजिकच्या कॅप्टन्सी कार्याला गुण देत असल्याचे पाहायला मिळते. घरातील सदस्यांपैकी अर्चना गौतम सोडून अन्य सदस्यांनी त्याला चांगले गुण दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओच्या शेवटी या प्रकरणावरुन अब्दू व अर्चना यांच्यामध्ये वाद झाल्याचे दिसले. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, घरातील एका टास्कदरम्यान अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यात भांडण सुरु झाले. पुढे अर्चना त्याच्याशी मारामारी करायला लागली. शारिरीक हिंसा केल्याने तिला ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर काढण्यात आले आहे. ‘बिग बॉस १६’ शी निगडीत सर्व अपडेट देणाऱ्या ‘बिग बॉस तक’ या ट्विटर अकाऊंटने अर्चना गौतमीची ही बातमी ट्विट केली आहे. यामुळे कार्यक्रमाची फिड काही काळासाठी बंद केली होती अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजूनही याबाबत शोच्या निर्मात्यांनी किंवा कलर्स वाहिनीने अधिकृत घोषणा केली नसल्याने ही अफवा असू शकते असे म्हटले जात आहे.

आणखी वाचा – “तू गुटगुटीत असूनही…” प्रशांत दामलेंनी सांगितली सुनील गावस्करांची ‘ती’ खास आठवण

दरम्यान कलर्स वाहिनीने त्यानंतर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अब्दू रोजिकची कॅप्टन्सी टिकावी यासाठी बिग बॉस सदस्यांना नवा टास्क देतात. या टास्कवरुन तो पुढेही घरातला कॅप्टन राहिलं की, कॅप्टनशीपसाठी नव्या स्पर्धकाची निवड केली जाईल हे ठरणार आहे. परिणामी अर्चनाबद्दलची ही बातमी खरी की खोटी हे कार्यक्रमाचा नवा भाग प्रसारित झाल्यानंतर कळणार आहे.

आणखी वाचा – अक्षय कुमारचा एक व्हिडीओ अन् ट्विटरवर सुरु झाला ‘#HeraPheri3’ चा ट्रेंड, जाणून घ्या नेमकं प्रकरण

अर्चना गौतम बिग बॉसच्या घरातली तगडी स्पर्धक आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तिच्या खेळामध्ये फरक पडल्याचे दिसत होते. रविवारच्या भागामध्ये सलमान खानही तिच्यावर ओरडला होता. असे असले तरी, तिच्या घराबाहेर पडण्याच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. ते सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 16 did archana gautam thrown out of the house yps