‘बिग बॉस १६’ शोमधील सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक म्हणजे दिग्दर्शक साजिद खान. साजिदवर लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप होत असताना ‘बिग बॉस’च्या घरातही त्याचं एक वेगळंच रुप पाहायला मिळालं. भांडण, अपशब्द वापरायला त्याने सुरुवात केली. साजिदला घरातून बाहेर काढण्याची मागणीही प्रेक्षक करू लागले, आता या सगळ्या वादामध्ये साजिदने एक नवा खुलासा केला आहे.
आणखी वाचा – Video : “हा तर म्हातारा” वाढलेली पांढरी दाढी, शरीरयष्टी पाहून आमिर खानला ओळखणंही झालं कठीण, व्हिडीओ व्हायरल
घरातील सदस्यांमध्ये वाद होत असेल तर साजिद ते सोडवण्याचा प्रयत्न करताना नेहमीच दिसतो. आताही तसंच घडलं. सौंदर्या व शिव ठाकरे एका टोमॅटोवरून भांडण झालं. भाजीमध्ये टोमॅटो का नाही? असं शिवने विचारलं. गोरीजवळ मी टोमॅटो मागितले होते पण तिने दिले नाही असं सौंदर्याने यावर उत्तर दिलं. यावरूनच शिव व सौंदर्यामध्ये भांडण होतं.
या भांडणामध्ये साजिदने सहभाग घेतला. पण सौंदर्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तर गौरीनेही तो बोलत आहे हे पाहून चेहऱ्यावरचे हावभाव बदलेले. साजिदला त्यांचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. यावर साजिद गोरीला म्हणतो, “तू जर राजस्थानची डान्सर असशील तर मीही एक कलाकार आहे.” हे ऐकून अर्चना गौतमला राग येतो. ती साजिदशी वाद घालू लागते.
आणखी वाचा – मला पुरुषाची गरज नाही म्हणत स्वतःशीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर? फोटो शेअर करत म्हणाली, “मी स्वतःच…”
या वादामध्ये साजिद स्वतःबाबतच एक खुलासा करतो. तो म्हणतो, “मीही एक डान्सर होतो. ३०० रुपयांसाठी मी डान्सबारमध्ये नाचायचो. अशाप्रकारेच मी माझ्या करिअरची सुरुवात केली. मी गोरीसाठी कोणत्याच प्रकारचे अपशब्द वापरले नाहीत.” साजिद सुरुवातीच्या काळामध्ये करत असलेलं हे काम आणि त्याबाबत त्याचं वक्तव्य ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं.