बॉलिवूडपासून ते टीव्ही जगतापर्यंत ग्लॅमरच्या या क्षेत्रात कास्टिंग काऊच ही सामान्य बाब होत चालली आहे. अलिकडच्या काळात अनेक कलाकारांनी याबाबत आवाज उठवला आहे. कास्टिंग काऊचबद्दल फक्त अभिनेत्रीच नाही तर काही अभिनेत्यांनाही खूपच धक्कादायक अनुभव आले आहेत. असाच अनुभव बिग बॉस फेम टीव्ही अभिनेता अंकित गुप्ताने शेअर केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर केल्याने अंकित सध्या चर्चेत आहे.
नुकत्याच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अंकित गुप्ताने त्याला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबाबत भाष्य केलं. अंकितला त्याच्या करिअरच्या सुरुवातीला खूपच विचित्र सल्ला मिळाला होता आणि हा सल्ला खूपच धक्कादायकही होता. अंकित म्हणाला, “इथे खूप तडजोड करावी लागते. अनेक लोक होते ज्यांना वाटत होतं की मी पण ही तडजोड करावी. ते सांगायचे अंकित असंच काम मिळत नाही या इंडस्ट्रीमध्ये. आम्ही खूप लोकांना लॉन्च केलं आहे. पण त्यासाठी तडजोड करावीच लागते.”
आणखी वाचा- Bigg Boss 16 : अंकित गुप्ताच्या हॉटेल रुममध्ये दिसलेली ‘ती’ मुलगी कोण? समोर आलं सत्य
अंकित पुढे म्हणाला, “जे लोक मला अशाप्रकारचे सल्ले द्यायचे त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांना लॉन्च केलं आहे आणि त्या सर्वांनी आज ते ज्या ठिकाणी आहेत तिथे पोहोचण्यासाठी तडजोड केली आहे.” याचबरोबर अंकितने आणखी एक धक्कादायक खुलासा केला. एका व्यक्तीने त्याच्याकडे प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याची परवानगी मागितली होती. आपल्या आयुष्यातील वाईट घटनेचा उल्लेख करत अंकित म्हणाला, “मी अशी तडजोड करण्यास थेट नकार दिला तरीही त्यातील एका व्यक्तीने माझ्या अशा गोष्टीची मागणी केली की मला स्वतःलाच कळेना की यावर काय करावं. ते म्हणाले, ठीक आहे. तुला तडजोड करायची नाही तर नको करू पण कमीत कमी मला त्याला (प्रायव्हेट पार्ट) स्पर्श करू दे. वरून का असेना. त्यांचं बोलणं ऐकून मला धक्का बसला. माझ्याबरोबर काय होतंय हे मला समजत नव्हतं.”
आणखी वाचा- Video : “हा दारू पिऊन…” ‘बिग बॉस १६’मधून बाहेर पडलेला स्पर्धक पबमध्ये बेभान होऊन नाचला
अंकिता गुप्ताच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने कलर्स टीव्हीवरील ‘उडारिया’ मालिकेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मालिकेनंतर तो ‘बिग बॉस १६’ मध्ये सहभागी झाला होता. पण या शोमधून तो लवकरच बाहेर पडला. दरम्यान लवकरच तो छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. आगामी काळात अंकित ‘जुनूनियत’मध्ये दिसणार आहे.