‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री प्रियांका चौधरी नेहमी चर्चेत असते. ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वात ती सहभागी झाली होती. टॉप पाच फायनलिस्टमध्ये तिने जागा मिळवली होती. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असते. व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतंच प्रियांकाने इंडस्ट्रीतील बॉडी शेमिंगबाबत भाष्य केलं आहे. यावेळी तिला आलेला बॉडी शेमिंगचा अनुभवही तिने सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- शिव ठाकरेने चाहत्याची मागितली जाहीर माफी, कारण…

प्रियांका म्हणाली, “मी बॉडी शेमिंगचा सामना केला आहे. बिग बॉसच्या घरातही अशा प्रकारची घटना घडली आहे. आजही लोक वजनावरून समोरच्या व्यक्तीला टोमणे मारतात. मला वजन कमी असल्यामुळे अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. २५ वर्षांनंतर प्रत्येकाच्या शरीराला व्यायामाची गरज असते असं मला वाटतं. प्रत्येक वेळी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे नसते. प्रत्येकाला हे का करायचे आहे याची स्वतःची निवड आहे.”

प्रियांका ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी एक होती. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसाठीही प्रियांका चौधरी व शिव ठाकरे ही दोन नावे पुढे होती. परंतु, रॅपर एमसी स्टॅनला सर्वाधिक मतं मिळाल्याने तो यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. त्यामुळे प्रियांकाच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 16 fame priyanka chahar choudhary revealed she faced body shaming due to underweight dpj