‘बिग बॉस हिंदी’चं १६ वं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत होतं. मराठमोळा शिव ठाकरे या पर्वाच्या विजेतेपदाच्या शर्यतीत होता. परंतु, पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने सर्वाधिक मतं मिळवत बाजी मारली. त्यामुळे शिवला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. शिव ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वाधिक चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता.
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच शिवला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळालं. याशिवाय चित्रपटांच्या ऑफरही शिवला मिळाल्या. त्यामुळे त्याचे चाहतेही आनंदी होते. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर शिवने गाडी घेण्याची इच्छा मुलाखतीत व्यक्त केली होती. शिवचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. ‘बिग बॉस’मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शिवने नवीकोरी कार खरेदी केली आहे.
हेही वाचा>> प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्यावर जीममध्ये हल्ला, चाकूने केले वार; व्हिडीओ व्हायरल
‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शिवचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शिव त्याच्या कुटुंबियांसह नव्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. शिवने ‘टाटा हॅरिअर’ ही गाडी खरेदी केली आहे. शिवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा>> ‘बाहुबली’ फेम अभिनेत्याला एका डोळ्याने दिसत नाही, किडनीही केली ट्रान्सप्लांट, म्हणाला “त्यांनी मृत्यूनंतर…”
‘बिग बॉस हिंदी’मध्ये सहभागी होण्याआधी शिव अनेक रिएलिटी शोमध्ये झळकला आहे. ‘रोडीज’मध्ये शिव सहभागी झाला होता. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही त्याने सहभाग घेतला होता. या पर्वाचा तो विजेता ठरला होता.