‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाच्या ट्रॉफीसाठी मराठमोळा शिव ठाकरे दावेदार मानला गेला होता. रॅपर एमसी स्टॅन व शिव ठाकरे यांच्यात ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. परंतु, स्टॅनने बाजी मारल्यामुळे शिव फर्स्ट रनर अप ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठमोळ्या शिवचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ‘बिग बॉस’नंतर अमरावतीत चाहत्यांकडून त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मुंबईत परतल्यानंतर शिवला त्याच्या चाहतीकडून एक खास गिफ्ट मिळालं आहे. शिवला दोन एअर हॉस्टेसने चिठ्ठी लिहिली आहे. “मी तुमचा आदर करते. मला तुमचं कौतुक आहे. तुम्हाला पुन्हा भेटायला मला आवडेल. आई शप्पथ. तुम्हाला खूप सारं प्रेम. माझी आईही तुमची खूप मोठी चाहती आहे”, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे. सरोज व शिवानी या दोन एअर होस्टेटने मिळून शिवला ही चिठ्ठी दिली आहे.

हेही वाचा>> अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’मध्ये काम करण्यास समांथाचा नकार; समोर आलं खरं कारण

शिवने या चिठ्ठीचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता. या स्टोरीला त्याने “किती छान, धन्यवाद” असं कॅप्शनही दिलं होतं. ‘बिग बॉस’ नंतर शिवच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. शिवने इन्स्टाग्रामवर दोन मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा>> स्वरा भास्करने कोर्ट मॅरेज केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट, म्हणाले “फहाद अहमद…”

शिव ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. त्यामुळे ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाची ट्रॉफीही शिव नावावर करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, एमसी स्टॅनला सर्वाधिक मतं मिळाल्यामुळे शिवला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 16 fame shiv thakare received letter from air hostess fan kak