छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त असलेल्या बिग बॉस हिंदी या शोचं सोळावं पर्व गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक सेलिब्रेट करण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कुटुंबियांपासून लांब असलेल्या बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या जवळच्या व्यक्ती त्यांना भेटायला येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. साजिदला भेटायला त्याची बहीण व बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने बिग बॉगच्या घरात एन्ट्री घेतली आहे. साजिदला पाहताच फराह खान भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ कलर्सच्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर करण्यात आला होता.

हेही वाचा>> ‘RRR’ला सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्यासाठी पुरस्कार मिळाला, पण…

साजिद व फराहचा बिग बॉसच्या घरातील आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये साजिद व फराह एकमेकांशी गप्पा मारत आहेत. साजिद फराहला “तू एक पुरुष आहेस का?”, असा प्रश्न विचारतो. त्यावर उत्तर देत फराह साजिदलाच उलट प्रश्न विचारते. “हा प्रश्न मी तुला विचारते. तू पुरुष आहेस का?”, असं ती साजिदला म्हणते. फराह-साजिदचा बिग बॉसच्या घरातील हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> चार दिवस व्हेंटिलेटरवर होती ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली…

हेही पाहा>> Photos: ‘ब्लॅक इज ब्युटिफूल’ अन् काळ्या रंगाची थीम; दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्यातील लूकने वेधलं लक्ष

‘कलर्स’ने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पुढे साजिद “फराह खान बिग बॉसची चाहती आहे, हे अनेकांना माहीत नाहीये”, असं फराहला म्हणाला. यावर फराहने मजेशीर उत्तर दिलं. ती म्हणाली, “मी बिग बॉसची किती मोठी चाहती आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. मी दरवर्षी बिग बॉसच्या घरात येते. फक्त या वर्षी तू आहेस म्हणून मला पैसे  दिले गेले नाहीत”. काहीच आठवडे शिल्लक राहिल्याने बिग बॉस हिंदीचा खेळ आता अधिक रंजक होत चालला आहे.  