‘बिग बॉस १६’ या शोमधील सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे अर्चना गौतम. घरातील इतर सदस्यांशी अर्चनाचा असलेला वाद-भांडण कायमच चर्चेत राहिलं. आताही अर्चनाने विकास मानकतबरोबर भांडण केलं आहे. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अर्चनाने भांडणादरम्यान चक्क विकासच्या अंगावर उकळतं पाणी फेकलं. राग अनावर होताच तिने केलेलं हे कृत्य पाहून प्रेक्षकांनाही राग अनावर झाला. दरम्यान अर्चना व विकासचा हा वाद संपायचं काही नाव घेत नाही. या दोघांचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
‘कलर्स टीव्ही’ वाहिनीने ‘बिग बॉस १६’चा नवा प्रोमो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही भांडणामध्ये एकमेकांच्या अंगावर येताना दिसत आहेत. “कुत्र्यासारखं भुंकू नकोस चल चल” असं अर्चना विकासला म्हणते. यावर विकास म्हणतो, “तुझ्या बापाला जाऊन असं बोल.” यावर अर्चनाचा राग अनावर होतो. “बापावर जाऊ नकोस. तू स्वतः बाप बनू शकत नाहीस.”
आणखी वाचा – Video : रुग्णालयामध्ये तुनिषा शर्माचा मृतदेह पाहून आईची झाली अशी अवस्था, ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही हळहळले
दरम्यान “तुझ्यासारख्या लोकांना मी अशीच मारते.” असंही अर्चना म्हणते. यादरम्यान अर्चनाचा व गौतमचा स्वतःवरील ताबा सुटतो. दोघंही एकमेकांच्या अंगावर धावून जातात. हा नवा व्हिडीओ पाहून नेटकरी अर्चनालाच ट्रोल करत आहेत. तसेच अर्चना घरातील सदस्यांना अधिक त्रास देते असंही प्रेक्षक म्हणत आहेत.