‘बिग बॉस हिंदी १६’चा अंतिम सोहळा रविवारी(१२ फेब्रुवारी) पार पडला. रॅपर एमसी स्टॅनने सर्वाधकि मतं मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं. मराठमोळा शिव ठाकरे व एमसी स्टॅन यांच्यामध्ये अंतिम सोहळ्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर एमसी स्टॅनने बाजी मारली. तर शिव फर्स्ट रनर अप ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिव ठाकरेची ‘बिग बॉस हिंदी’च्या १६ व्या पर्वाची ट्रॉफी थोडक्यात हुकली. शिव ‘बिग बॉस हिंदी’च्या यंदाच्या पर्वाच्या ट्रॉफीचा प्रबळ दावेदार होता. पहिल्या दिवसापासूनच तो बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता. परंतु, त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. शिवची ट्रॉफी हुकल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. बिग बॉस मराठी फेम किरण मानेंनीही शिव ठाकरेसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा>> Bigg Boss 16:’बिग बॉस’चा विनर ठरलेल्या एमसी स्टॅनसाठी उर्फी जावेदचं ट्वीट, हार्ट इमोजी पोस्ट करत म्हणाली…

किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शिव ठाकरेबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. “याद उसी को रखा जाता है, जिसने ‘दिल’ जिता हो…फर्क नही पड़ता, हाथ में ट्रॉफी हो, या ना हो ! शिव, भावा मस्स्त खेळलास. लै भारी”, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. किरण मानेंच्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> “बिग बॉस पुन्हा बघणार नाही”, एमसी स्टॅन विजेता ठरल्यानंतर प्रेक्षकांमध्ये नाराजी, म्हणाले “शिव ठाकरे व प्रियांकाने मेहनत…”

हेही वाचा>> ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हुकली पण शिव ठाकरेची ‘ती’ इच्छा पूर्ण, म्हणालेला “सलमान सरांच्या…”

शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. ‘बिग बॉस हिंदी’च्या घरातही त्याने पहिल्या दिवसापासूनच त्याचा खेळ खेळायला सुरुवात केली होती. त्यामुळे ‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाच्या ट्रॉफीवर शिव ठाकरे नाव कोरेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 16 finale kiran mane shared special post for firt runner up shiv thakare kak