बिग बॉस १६ च्या महाअंतिम सोहळ्याची प्रतीक्षा आता संपली आहे. आज संध्याकाळी या सीझनचा विजेता घोषित केला जाणार आहे. विजेपदासाठी शिव ठाकरे, प्रियांका चौधरी आणि एमसी स्टॅन यांच्यात तगडी टक्कर होणार असल्याचं बोललं जात आहे. मराठी बिग बॉस सीझन २ चा विजेता शिव ठाकरे आता बिग बॉस १६ च्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र सद्यस्थितीला कोणतीही शक्यता वर्तवणं कठीण आहे. पण सध्या सोशल मीडियावर शिव ठाकरेचा एक व्हिडीओ मात्र बराच व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला शिव ठाकरेचा हा व्हिडीओ बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा आहे. ज्याचं विजेतेपद शिवने जिंकलं होतं. व्हिडीओमध्ये होस्ट महेश मांजरेकर शिव ठाकरे आणि नेहा शितोळे यांचे हात पकडून उभे असलेले दिसत आहेत. सर्वजण विजेत्याचं नाव घोषित केलं जाण्याची वाट पाहत आहेत आणि अशातच महेश मांजरेकर शिव ठाकरेचं नाव विजेता म्हणून घोषित करताना दिसत आहेत. शिव स्वतःही हे ऐकून आश्चर्यचकीत होतो.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

आणखी वाचा- Bigg Boss 16 Finale: “तुझ्यासाठी मोठा दिवस…”, अभिजीत केळकरची शिव ठाकरेसाठी खास पोस्ट

सोशल मीडियावर शिव ठाकरेचे चाहते हा व्हिडीओ शेअर करत आहेत. चाहत्यांना आशा आहे की हा क्षण आज त्यांना पुन्हा अनुभवायला मिळेल आणि शिव ठाकरे बिग बॉस १६ चा विजेता होईल. शिव ठाकरेबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ते शिवला वोट करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. याशिवाय प्रिन्स नरूला आणि रणविजय सिंघा यांनीही शिव ठाकरेला पाठिंबा देत त्याला वोट करण्याचं आवाहन केलं आहे.

आणखी वाचा- “प्रत्येक नवऱ्याची अवस्था…”, प्रसाद ओकचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

दरम्यान बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा १२ फेब्रुवारीला म्हणजे आज पार पडणार आहे. आज बिग बॉस हिंदीचा शेवटचा भाग प्रदर्शित केला जाणार आहे. बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. याच भागात बिग बॉसचा विजेता जाहीर केला जाणार आहे. सलमान खान या महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहे. कलर्स वाहिनीवर रात्री ९ वाजता बिग बॉस हा कार्यक्रम तुम्हाला पाहता येणार आहे. त्याबरोबरच तुम्ही Voot अॅपवर देखील हा शो पाहू शकता.

Story img Loader