‘बिग बॉस १६’ हा शो दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे. गेल्या आठवड्यात या शोमध्ये शालीन भानोत आणि रॅपर एमसी स्टॅन यांच्यात जोरदार भांडण झालं. स्टॅन शालीनला मारायला धावला, पण बाकी स्पर्धकांनी मधे पडत त्याला रोखलं. यानंतर शुक्रवार का वारमध्ये सलमानने स्टॅनसह शालीनला फटकारलं. सलमानने काही सदस्यांना खेळाबद्दल सल्ले दिले, तर काहींना त्यांच्या हातून होणाऱ्या चुका सांगितल्या. याच दरम्यान, रविवारी एका सदस्याला घरातून बाहेर पडावं लागलं.
हेही वाचा – Bigg Boss Marathi 4: किरण माने घराबाहेर, पण खेळाबाहेर नाही! बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट
या आठवड्यात शालीन भानोत, टिना दत्ता, सौंदर्या शर्मा आणि गौतम विग हे स्पर्धक एलिमिनेट झाले होते. चारही स्ट्राँग स्पर्धक एलिमिनेट झाल्याने नक्की कोण घराबाहेर जाणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. रविवारी होस्ट सलमान खानने याबद्दलची घोषणा केली आणि गौतम विग घराबाहेर पडला. गौतम गेल्यावर सौंदर्या हमसून हमसून रडताना दिसली. पण अगदी काही वेळात ती शांत झाली आणि शालीनशी हसत हसत बोलत होती. त्यामुळे सौंदर्याला खरंच गौतमच्या जाण्याचं वाईट वाटलं का, असा प्रश्न घरातील इतर सदस्यांना पडला.
खरं तर, गौतम गेल्यानंतर सौंदर्या शालीनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. तिची मैत्रीण अर्चनाने तिला गौतमला विसरून शालीनशी मैत्री करायला सांगितलं. तसंच आता बदला घेण्याची वेळ आली आहे, असेही अर्चना म्हणाली. दरम्यान, ही मैत्री एकतर्फी आहे, असं नाही. कारण गौतम घरातून बाहेर पडताच शालीनही सौंदर्याजवळ पोहोचला आणि रडणाऱ्या सौंदर्याला त्याने आधार देण्याचा प्रयत्न केला.
“तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन…” मराठी चित्रपटाचा शो रद्द केल्यानंतर हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट
सौंदर्याने अर्चनाला सांगितलं की शालीनने तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. यावर अर्चना म्हणाली की ‘शालीनशी जवळीक साधून टीनाला जळवण्याची आता चांगली संधी आहे, आधी ते दोघेही आपल्याबरोबर गेम खेळले होते, आता आपणही तेच करायचं.’ अर्चनाच्या या सल्ल्यानंतर सौंदर्या शालीनशी जवळीक करण्यासाठी किती प्रयत्न करते, ते शोच्या आगामी एपिसोडमध्ये कळेल.