‘बिग बॉस १६’चा आता आठवा आठवडा सुरू आहे. सुंबूल तौकीर खानचा जवळचा मित्र फहमान खानने ‘बिग बॉस’च्या घरामध्ये प्रवेश केला. फहमान वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून घरात आला असल्याचं सगळ्यांचा समज होता. मात्र तो ‘धर्मपत्नी’ हा त्याचा शो प्रमोट करण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आला होता. आता दोन गोल्डन बॉयची ‘बिग बॉस’च्य घरामध्ये एन्ट्री झाली आहे.

आणखी वाचा – Video : “तुझा एक हात तुटला आहे आता दुसराही…” पहिल्याच दिवशी राखी सावंत व तेजस्विनीमध्ये जोरदार भांडण

गोल्डन बॉय अशी ओळख असलेला सनी वाघचौरे ‘बिग बॉस’च्या घरामध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. स्वतः सनीने तशी पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली होती. आता हिंदी कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याचा प्रोमो शेअर केला आहे.

कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गोल्डन बॉय सनी नानासाहेब वाघचौरे व संजय गुजर यांची घरात एन्ट्री झालेली दिसत आहे. सनी व संजयच्या गळ्यामधील सोनं पाहून घरातील सदस्य आश्चर्यचकीत होतात. तसेच त्यांच्याकडे एकटक बघत बसतात. सनी हा पुण्याचा आहे.

आणखी वाचा – “अंड्याची भुर्जी व राखी सावंतची मर्जी, ए शेवंते” ‘बिग बॉस मराठीच्या’ घरात प्रवेश करताच ड्रामा क्वीनची डायलॉग बाजी, प्रेक्षक म्हणतात…

टीना दत्ताला सनी व संजय इतक्या वजानाचे दागिने कसे परिधान करतात? हा प्रश्न पडतो. तर घरातच येताच सनी एमसी स्टॅनला म्हणतो, “तुला एकटं वाटत होतं ना म्हणूनच आम्ही आलो आहोत.” सनी व संजय सदस्यांच्या प्राइज मनीमधील २५ लाख रुपये रक्क्मही घेऊन आले आहेत. हा व्हिडीओ पाहून आता घरामध्ये राडा होणार असं प्रेक्षक म्हणत आहेत. आता गोल्डन बॉयच्या प्रवेशानंतर घरामध्ये आणखी काय काय घडणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Story img Loader