Bigg Boss 16 Grand Finale 2023: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस कडे पाहिले जाते. ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा रंजक प्रवास आता लवकरच संपणार आहे. ‘बिग बॉस’ हिंदीचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी (१२ फेब्रुवारी) रंगणार आहे. यंदा बिग बॉस हिंदीच्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. सध्या बिग बॉस हिंदीच्या महाअंतिम सोहळ्याची जय्यत तयारीही सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा कधी, कुठे आणि कसा पाहता येईल, याची आपण माहिती घेणार आहोत.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बिग बॉस १६ चा विजेता कोण होणार? याबद्दल विविध तर्क-वितर्क लावले जात आहे. बिग बॉसच्या १६ व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे.

How to find computers IP address
संगणकाचा IP Address कसा शोधायचा? जाणून घ्या एका क्लिकवर..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
RRC NCR Apprentice Recruitment 2024: Apply for 1679 posts at rrcpryj.org know how to apply
RRC NCR Recruitment 2024: रेल्वेत १६७९ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा
How When and Where to Watch Apple iPhone 16 Launch Event
Apple iPhone 16 Launch Event 2024 : आयफोन १६ ची किंमत किती असणार? वेळ, तारीख अन् कुठे बघता येईल लाइव्ह जाणून घ्या
cravings can indicate hidden health issues and nutritional deficiencies
Nutritional Deficiencies : तुम्हाला सतत चॉकलेट किंवा चिप्स खाण्याची इच्छा होते? शरीरात ‘या’ पौष्टिक घटकांची असू शकते कमतरता; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
products that will not debut on 9 September 2024
Apple Event 2024: ॲपल इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच, कोणते नाही? जाणून घेण्यासाठी वाचा ‘ही’ सविस्तर यादी
Paris Paralympics 2024 | what is the meaning of The Agitos Logo
Paralympics 2024 : पॅरालिम्पिक लोगोचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या, काळानुसार लोगो कसा बदलला?
How to unsend an email in Gmail
How to undo Gmail : एकदा पाठवलेला मेल आता ‘Undo’ करता येणार; फक्त ‘या’ चार स्टेप्स फॉलो करा

कधी, कुठे आणि कसा पाहता येणार?

बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा १२ फेब्रुवारीला होणार आहे. येत्या रविवारी बिग बॉस हिंदीचा शेवटचा भाग प्रदर्शित केला जाणार आहे. याच भागात बिग बॉसचा विजेता जाहीर केला जाणार आहे. सलमान खान या महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहे. येत्या १२ फेब्रुवारीला कलर्स वाहिनीवर रात्री ९ वाजता बिग बॉस हा कार्यक्रम तुम्हाला पाहता येणार आहे. त्याबरोबरच तुम्ही Voot अॅपवर देखील हा शो पाहू शकता.

बिग बॉस हिंदीच्या महाअंतिम सोहळ्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना मत देताना दिसत आहेत. बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. यामुळे सोशल मीडियावर सध्या यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदा बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठीचा सोळावा सीझन कोण जिंकणार हे पाहणे? महत्त्वाचे ठरणार आहे.