Bigg Boss 16 Finale Live Updates: ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६व्या पर्वाचा आज ग्रँड फिनाले आहे. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत या पाच स्पर्धकांपैकी हा शो कोण जिंकणार, याची घोषणा आज केली जाणार आहे. होस्ट सलमान खान आज विजेत्याची घोषणा करेल. तसेच या पर्वातील माजी स्पर्धकदेखील ग्रँड फिनाले सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. त्यापैकी काही स्पर्धकांचा डान्स परफॉर्मन्सदेखील होईल.

Live Updates

'बिग बॉस १६' ग्रँड फिनालेचे लाइव्ह अपडेट्स

00:33 (IST) 13 Feb 2023
पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन ठरला 'बिग बॉस १६' चा विजेता

पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस १६' चा विजेता ठरला आहे. तर मराठमोळा शिव ठाकरे उपविजेता ठरला आहे.

00:18 (IST) 13 Feb 2023
अमरावतीचा शिव अन् पुण्याचा MC स्टॅन, कोण जिंकणार ट्रॉफी

प्रियंका चहर चौधरी बिग बॉसच्या ग्रँड फिनालेतून बाहेर पडली आहे. आता अंतिम सामना अमरावतीचा शिव अन् पुण्याचा MC स्टॅन यांच्यादरम्यान रंगणार आहे. या दोघांपैकी कोण जिंकणार ते लवकरच कळेल.

23:59 (IST) 12 Feb 2023
बिग बॉसच्या घरातून कोणता सदस्य बाहेर पडणार?

सध्या घरात शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी व एमसी स्टॅन हे बिग बॉसच्या घरातील टॉप ३ सदस्य आहेत. लवकरच टॉप २ सदस्यांची घोषणा सलमान खान करणार आहे.

23:42 (IST) 12 Feb 2023
Bigg Boss 16 Grand Finale 2023 : हे’ असणार ‘टॉप २’ सदस्य? अमरावतीचा मराठमोळा शिव ठाकरे ऐनवेळी घराबाहेर पडणार का?

‘बिग बॉस १६’च्या टॉप २ सदस्यांची सोशल मीडियावर चर्चा, कोण असणार ‘बिग बॉस १६’चा विजेता?

इथे वाचा सविस्तर बातमी

23:11 (IST) 12 Feb 2023
प्रियंका-अंकितचा रोमँटिक डान्स

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये प्रियंका चहर चौधरी व अंकित गुप्ताने रोमँटिक डान्स केला.

23:06 (IST) 12 Feb 2023
Bigg Boss 16 Grand Finale 2023 : ‘बिग बॉस हिंदी’च्या १६ व्या पर्वाचे टॉप ३ स्पर्धक अखेर जाहीर

Bigg Boss 16 Grand Finale 2023 : ‘बिग बॉस हिंदी’च्या १६ व्या पर्वाचे टॉप ३ स्पर्धक अखेर जाहीर

वाचा सविस्तर बातमी

22:50 (IST) 12 Feb 2023
शिव ठाकरे ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी अमरावतीला घेऊन जाणार का? साजिद खानच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण, म्हणाला, “तू निराश…”

शिव ठाकरेबाबत साजिद खानचं वक्तव्य, शिव ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकणार का?

इथे वाचा सविस्तर बातमी

22:20 (IST) 12 Feb 2023
बिग बॉसमधून अर्चना गौतम बाहेर

बिग बॉस १६च्या ग्रँड फिनालेमध्ये आता फक्त टॉप ३ सदस्य बाकी राहिले आहेत. शालीनपाठोपाठ आता अर्चना गौतम ग्रँड विजेत्यांच्या रेसमधून बाहेर पडली आहे.

22:02 (IST) 12 Feb 2023
Bigg Boss 16 Grand Finale 2023 : ‘बिग बॉस’च्या घरातून एक स्पर्धक बाहेर, टॉप ४ सदस्यांची नावं समोर

Bigg Boss 16 Grand Finale 2023 : बिग बॉसच्या घरातून टॉप ४ सदस्यांची नावं समोर आलं आहे. टॉप ५ स्पर्धकांपैकी एक सदस्य घराबाहेर पडला आहे. त्याबरोबर विजेत्याला मिळणाऱ्या रक्कमेतही वाढ झाली.

Bigg Boss 16 Grand Finale 2023 : ‘बिग बॉस’च्या घरातून एक स्पर्धक बाहेर

21:50 (IST) 12 Feb 2023
बिग बॉसच्या घरातून ‘हा’ सदस्य बाहेर

बिग बॉसच्या घरातून शालीन भानोत बाहेर पडला आहे. स्पर्धकांनी तो पाचव्या स्थानावर असल्याचं म्हणत त्यांचा निर्णय बिग बॉसला सांगितला. शालीनला प्रेक्षकांनीही कमी मतं दिली, त्यामुळे या निर्णयानंतर घरातील स्पर्धकांची प्राइज मनी ३१ लाख रुपये झाली आहे.

21:42 (IST) 12 Feb 2023
Bigg Boss 16: कोण आहे एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड बुबा?

स्टॅनच्या गर्लफ्रेंडचं खरं नाव काय आहे, ती काय करते, याबद्दल जाणून घेऊयात.

सविस्तर वृत्त इथे वाचा

21:36 (IST) 12 Feb 2023
Bigg Boss 16 Grand Finale 2023: बिग बॉसच्या विजेता घोषित होण्यापूर्वी अर्चना गौतमचा डान्स

‘बिग बॉस’ हिंदीच्या १६व्या पर्वाचा आज ग्रँड फिनाले आहे. यावेळी अर्चना गौतमने विविध हिंदी गाण्यांवर डान्स केला.

21:27 (IST) 12 Feb 2023
एमसी स्टॅनला प्रियंका आवडते? सलमानचा प्रश्न

एमसी स्टॅनला प्रियंका आवडते? असा प्रश्न सलमान खानने अर्चना गौतमला विचारला. त्यावर अर्चनाने हो असं उत्तर दिलं. पण, स्टॅनने गर्लफ्रेंड बुबाची शपथ घेत असं काही नसल्याचं म्हटलं.

20:31 (IST) 12 Feb 2023
बिग बॉसमधून कोण बाहेर जाणार?

बिग बॉसमध्ये सध्या शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत ट्रॉफी जिंकण्याच्या रेसमध्ये आहे. पण आता एक सदस्य घराबाहेर पडणार आहे, कोण असेल तो सदस्य?

//www.instagram.com/embed.js

20:11 (IST) 12 Feb 2023
प्रियंकाने शिवला दिला सल्ला

'तोंडावर बोलणे, दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीत पडणे आणि मैत्री करणे, या गोष्टी शिवने माझ्याकडून शिकाव्या,' असं प्रियंका चहर चौधरी म्हणाली.

19:52 (IST) 12 Feb 2023
साजिद खानने केलं शिव ठाकरेचं कौतुक

ग्रँड फिनालेमध्ये भारती व कृष्णाने शिव तसेच साजिदला एकमेकांबद्दल मनातील भावना व्यक्त करण्यास सांगितल्या. यावेळी साजिदने शिवचं कौतुक केलं आणि 'तूच ट्रॉफीचा खरा हकदार आहेस, पण ट्रॉफी नाही मिळाली तर तू निराश होऊ नकोस,' असंही म्हटलं.

19:47 (IST) 12 Feb 2023
ग्रँड फिनालेची झलक, पाहा व्हिडीओ

बिग बॉस १६ चा ग्रँड फिनाले सुरू आहे. या फिनालेची एक झलक कलर्स टीव्हीने शेअर केली आहे. https://www.instagram.com/p/CokJtuVJVlI/?hl=en

19:39 (IST) 12 Feb 2023
शालीनच्या मांडीवर बसली निमृत

संगीत खुर्ची खेळताना निमृत कौर अहलुवालिया शालीनच्या मांडीवर बसली. त्यानंतर सर्व स्पर्धक हसू लागले.

19:30 (IST) 12 Feb 2023
Bigg Boss 16 Grand Finale 2023: बिग बॉसच्या घरात रंगला संगीत खुर्चीचा खेळ

Bigg Boss 16 Grand Finale 2023: बिग बॉसच्या घरात रंगला संगीत खुर्चीचा खेळ, मंडली आणि नॉन मंडली या दोन गटातील कोणता सदस्य जिंकणार

19:28 (IST) 12 Feb 2023
अर्चनामध्ये हवा भरली आहे, भारती सिंगचा टोला

कृष्णा अभिषेक व भारती सिंग बिग बॉसच्या घरात पोहोचले आहे. ते घरातील स्पर्धकांशी संवाद साधत आहेत. यावेळी भारतीने अर्चनाला टोला लगावला आहे.

19:18 (IST) 12 Feb 2023
कृष्णा अभिषेकची टॉप ५ स्पर्धकांबरोबर चर्चा

कृष्णाने टॉप ५ स्पर्धकांशी संवाद साधला. त्याने प्रियंका चहर चौधरी, शालिन भानोत, शिव ठाकरे, अर्चना गौतम आणि एमसी स्टॅन यांच्याशी त्यांच्या शोमधील प्रवासाबद्दल चर्चा केली.

19:15 (IST) 12 Feb 2023
Bigg Boss 16 Grand Finale 2023: बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाच्या ट्रॉफीची झलक

बिग बॉसच्या महाअंतिम फेरीला सुरुवात, पाहा यंदाच्या पर्वाची ट्रॉफीची झलक

https://www.instagram.com/p/CokB84jrwr2/

19:14 (IST) 12 Feb 2023
बिग बॉसच्या सेटवर सनी देओल, अमिषा पटेलची हजेरी

बिग बॉसच्या सेटवर सनी देओल व अमिषा पटेल यांनी हजेरी लावली. दोघांचाही गदर २ चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

19:12 (IST) 12 Feb 2023
Bigg Boss 16 Grand Finale 2023: बिग बॉसचे टॉप ५ स्पर्धक कोण?

Bigg Boss 16 Grand Finale - बिग बॉसच्या टॉप ५ स्पर्धकांची नावे

  • शिव ठाकरे
  • MC स्टेन
  • प्रियांका चहर चौधरी
  • अर्चना गौतम
  • शालीन भानोत
  • 19:09 (IST) 12 Feb 2023
    बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला सुरुवात

    भारती सिंग आणि कृष्णा अभिषेक यांनी सलमान खानसोबत बिग बॉस १६ च्या फिनालेची सुरुवात केली.

    bigg-boss-16-salman-khan

    (बिग बॉस ग्रँड फिनाले)

    Story img Loader