Bigg Boss 16 Grand Finale 2023 : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज रंगताना दिसत आहे. बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले होते. अखेर बिग बॉसच्या टॉप २ स्पर्धकांची घोषणा झाली. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघेही टॉप २ सदस्य ठरले आहेत.
आज (१२ फेब्रुवारी) संध्याकाळी ७ वाजल्यापासून बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने बिग बॉसचे सूत्रसंचालन केले. यंदा बिग बॉसच्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी या स्पर्धकांनी टॉप ५ स्पर्धकांबरोबर विविध खेळ खेळले.
आणखी वाचा : Bigg Boss 16 Finale Live: ‘बिग बॉस’च्या घरातून प्रियंका चौधरी बाहेर; अमरावतीचा शिव अन् पुण्याचा MC स्टॅन, कोण जिंकणार ट्रॉफी
बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले होते. यातील एका टास्कदरम्यान शालीन भानोत हा घराबाहेर पडला. यानंतर अर्चना गौतम हिचा बिग बॉसचा प्रवास संपला.
यानंतर सलमान खानने बिग बॉसच्या टॉप २ सदस्यांची घोषणा केली. यावेळी सलमान खानने शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघं टॉप २ सदस्य ठरल्याची घोषणा केली. तर प्रियांका चौधरी हिचा बिग बॉसचा प्रवास संपल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.