Bigg Boss 16 Finale Live Updates: ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६व्या पर्वाच्या ग्रँड फिनालेला आता सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी कोण जिंकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. घरामध्ये ‘बिग बॉस १६’च्या इतर सदस्यांची एण्ट्री झाली आहे. अशामध्येच साजिद खानने शिवचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. शिवच ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकावा असं साजिदचं म्हणणं आहे.
काय म्हणाला साजिद खान?
शिव व साजिदमधील मैत्री सगळ्यांनाच ठाऊक आहे. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये दोघांत घट्ट मैत्री झाली. साजिदने फिनालेनिमित्त पुन्हा घरात प्रवेश केला आहे. यावेळी साजिद म्हणाला, “सुरुवातीपासूनच शिव ठाकरेसाठी ‘बिग बॉस’ची ट्रॉफी किती महत्त्वाची आहे हे मी पाहिलं आहे. शिवच ही ट्रॉफी जिंकावा असं मी बोलत आलो आहे.”
आणखी वाचा – वीणा जगताप व शिव ठाकरेचं ब्रेकअप झालंच नाही? ‘बिग बॉस’च्या घरात आठवली गर्लफ्रेंड, म्हणाला…
“नेहमी बिग बॉसच्या घरासमोर डोकं ठेवताना मी शिवला पाहिलं आहे. तरीही आज मी एक सांगू इच्छितो शिव तू आज जिंकला नाहीस तरी निराश नको होऊ.” पण यादरम्यान साजिदने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. शिव आता ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिवला प्रेक्षकांसह त्याच्या चाहत्यांचा भरभरुन पाठिंबा मिळत आहे. मराठी कलाकारही शिवसाठी एकवटले आहेत. शिवच जिंकावा यासाठी मराठी कलाकारांनी त्याला वोट करण्यासाठी खास पोस्ट शेअर केल्या होत्या. आता प्रियांका चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, शालिन भानोतमध्ये कोण विजेता ठरणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.