Bigg Boss 16 Grand Finale 2023 : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज रंगताना दिसत आहे. बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले आहेत. यातील एका स्पर्धकाचे बिग बॉसचा विजेता होण्याचे स्वप्न अपुरे राहिले.

आज (१२ फेब्रुवारी) संध्याकाळी ७ वाजल्यापासून बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने बिग बॉसचे सूत्रसंचालन केले. यंदा बिग बॉसच्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी या स्पर्धकांनी टॉप ५ स्पर्धकांबरोबर विविध खेळ खेळले.
आणखी वाचा : Bigg Boss 16 Finale Live: एमसी स्टॅनला प्रियंका आवडते? सलमानच्या प्रश्नावर रॅपर म्हणाला, “बुबाची…”

fraud of 18 lakhs by luring tickets for World Cup matches
विश्वचषक सामन्यांच्या तिकीटांचे आमिष दाखवून १८ लाखांची फसवणूक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Duleep Trophy Ishan Kishan 7th first class century
इशान किशनचे झंझावाती शतकासह निवडसमितीला प्रत्युत्तर; दुलीप ट्रॉफी सामन्यात चौकार-षटकारांची लयलूट
indian athletes performance in paralympics 2024
अन्वयार्थ : अक्षय क्षमतांचे क्षितिज!
Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…
Paralympic gold medal Praveen Kumar Paralympics sport news
हार न मानण्याची प्रवृत्ती हीच प्रवीणची ताकद
Neeraj chopra qualified for the Diamond League Finals sport news
नीरज डायमंड लीग अंतिम फेरीसाठी पात्र
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?

यावेळी सलमान खानने टॉप ५ स्पर्धकांना एकत्र बसवले. त्यानंतर बिग बॉसने टॉप ५ सदस्यांना एक टास्क दिला. या टास्कवेळी त्यांना पाच जणांपैकी एकाला पाचव्या क्रमांकावर ठेवण्यास सांगितले. याबरोबर त्यांना मिळणाऱ्या रकमेतही वाढ होणार असल्याचे सांगितले.

यावेळी शिव ठाकरे, एम सी स्टॅन, प्रियंका चौधरी, आणि अर्चना या चौघांनी शालीन भानोत हे नाव घेतले. तर शालीनने अर्चना असे नाव घेतले. यामुळे टॉप ५ सदस्यांचे शालीन भानोतवर एकमत झाले आणि तो बिग बॉसच्या घराबाहेर पडला. त्याबरोबर विजेत्याला मिळणाऱ्या रक्कमेतही वाढ झाली. त्यामुळे आता बिग बॉसच्या विजेत्याला ३१ लाख ५० हजार ही रक्कम मिळणार आहे.

आणखी वाचा : “कॉलेजपासून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने स्नेहलबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन

दरम्यान शालीन भानोत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याचे नशीब चमकले आहे. त्याला एका हिंदी मालिकेची ऑफर मिळाली. निर्माती एकता कपूरने शालीन भानोतला एका हिंदी शोची ऑफर दिली आहे. यात तो प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.