Bigg Boss 16 Grand Finale 2023 : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शो ‘बिग बॉस १६’चा आज ग्रँड फिनाले आहे. आता या शोच्या टॉप ३ स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. शिव ठाकरे, प्रियांका चौधरी, एमसी स्टॅन या तीन सदस्यांमध्ये ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पण ही ट्रॉफी नेमकी कोण जिंकणार याबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत आहेत.
सोशल मीडियावर ‘बिग बॉस १६’च्या टॉप २ सदस्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. प्रियांका, शिव व एमसी स्टॅनमध्ये सगळ्यात आधी घराबाहेर कोण पडणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पण शिव व प्रियांका ‘बिग बॉस १६’चे टॉप २ सदस्य आहेत असं बोललं जात आहे.
पण सध्या शिव सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहे. म्हणजेच शिवलाच प्रेक्षकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळत आहे. शिवाय ट्वीटरवरही शिवच ट्रेंड होत आहे. प्रेक्षकांसह त्याच्या चाहत्यांनाही शिवनेच बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी असं वाटत आहे. बिग बॉसच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
शालीन भानोत पाठोपाठ अर्चना गौतमही घराबाहेर पडली. अर्चना घराबाहेर येताच तिला अश्रू अनावर झाले. पण प्रेक्षकांनी कमी वोट केल्यामुळे तिला घराबाहेर जावं लागलं. सध्यातरी टॉप ३ सदस्य बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी लढत आहेत. ‘बिग बॉस १६’चा विजेता नक्की कोण असणार? हे थोड्यावेळातच समोर येईल.